ETV Bharat / state

नागपुरच्या मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर लाँचिंगचे कार्य ४ तासांत पूर्ण - नागपूर महामेट्रो रेल्वे ब्लॉक न्यूज

मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगवरून मार्ग तयार करण्यासाठी एकूण ६४.३८ मीटर लांब गर्डरची आवश्यकता होती. त्यापैकी १९ मीटरचे कार्य महामेट्रोने याआधीच पूर्ण केले होते. उर्वरित सुमारे ४५ मीटर लांब बौस्टिंग स्टील गर्डरचे लाँचिंग महामेट्रोने यशस्वीरित्या पूर्ण केले. या आरओबीची लांबी ४३.४८ मीटर व रुंदी १२.६ मीटर एवढी आहे. मुख्य म्हणजे आरओबीचे कार्य पूर्ण झाल्याने हा पूल आता वर्धा मार्गवरील ३ स्तरीय प्रणालीला (रस्ता, डबल डेकर उड्डाणपूल व मेट्रो मार्ग) हा आरओबी आता जोडला जाणार आहे.

मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर
मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर
author img

By

Published : Sep 27, 2020, 3:05 PM IST

नागपूर - तांत्रिकदृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे मनीष नगर आरओबीचे (रेल्वे ओव्हर ब्रिज) काम महामेट्रो नागपूरकडून पूर्ण केले जात आहे. शनिवारी मध्यरात्री महामेट्रोने ४ तास रेल्वे सेवा थांबवून कार्य पूर्ण केले आहे. एवढ्या वेळासाठी ब्लॉक घेण्याचा हा नागपुरातला कदाचित पहिलाच प्रसंग असेल.

मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर
मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर
मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर
मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर

मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगवरून मार्ग तयार करण्यासाठी एकूण ६४.३८ मीटर लांब गर्डरची आवश्यकता होती. त्यापैकी १९ मीटरचे कार्य महामेट्रोने याआधीच पूर्ण केले होते. उर्वरित सुमारे ४५ मीटर लांब बौस्टिंग स्टील गर्डरचे लाँचिंग महामेट्रोने यशस्वीरित्या पूर्ण केले. या आरओबीची लांबी ४३.४८ मीटर व रुंदी १२.६ मीटर एवढी आहे. मुख्य बाब म्हणजे, या आरओबीसोबत दोन्ही बाजूने १.५ मीटर प्रत्येकी फूटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिक सहजपणे रेल्वेलाइन क्रॉस करू शकतील. या स्टील गर्डरसाठी लागणाऱ्या फेब्रिकेशनचे काम पुणे येथे पूर्ण करण्यात आले. तसेच, मोठ्या ट्रेलरमध्ये गर्डर ठेवून महामार्गाने नागपूर येथे आणण्यात आले.

मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर
मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर
मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर
मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर

हेही वाचा - रंगी रंगला श्रीरंग.. कमला एकदशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास

आधुनिक आणि अनोख्या पद्धतीने या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. ३६० टन क्षमता असणाऱ्या या स्टील गर्डरला आधार देण्यासाठी खालून अंदाजे ४५०-५०० टन स्टीलचा उपयोग करण्यात आला. मनीष नगर रेल्वे ओवर ब्रिजच्या निर्माण कार्यात स्टील गर्डरचे कार्य सर्वात महत्वाचे होते, ज्यामुळे रेल्वे रुळाच्या वर दोन्ही मार्ग (मनीष नगर परिसर आणि वर्धा मार्गावरील उज्ज्वल नगर) एकमेकांना जोडले गेले. मुख्य म्हणजे, आरओबीचे कार्य पूर्ण झाल्याने हा पूल आता वर्धा मार्गवरील ३ स्तरीय प्रणालीला (रस्ता, डबल डेकर उड्डाणपूल व मेट्रो मार्ग) हा आरओबी आता जोडला जाणार आहे. महामेट्रोने एकाच निर्माण कार्यस्थळी २ वेगवेगळ्या पद्धतीचा रस्ता तयार केला आहे. जमिनीवरील मार्गावरून ५०० मीटर लांब आरयूबी तयार केला असून ६४.३८ मीटर लांब आरओबीचे कार्य पूर्ण केले आहे. उर्वरित कार्य लवकर पूर्ण करून ऑक्टोबर २०२०पासून हे आरओबी व आरयूबी नागरिकांकरिता खुला होणार, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - एकनाथ खडसेंना भाजपची दारे बंद..? फडणवीस विरोध पडला महागात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.