नागपूर - शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटणाचे दुकान लावण्याच्या वादातून एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे. जगदीश मदने असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. कुणाल उर्फ गोलू बावणे, विक्की बावणे, बलराज कटारे आणि राजू कटारे, असे या आरोपींची नावे आहे.
धारधार शस्त्रांनी वार करून हत्या -
शहरातील पाटणकर चौक येथे शुभम शेंडे व त्यांचे मामा जगदीश मदने हे मटण विक्रीचे दुकान चालवतात. त्यांच्या दुकानांसमोर धनराज बावणे यांनी सुद्धा मटणाचे दुकाण लावल्याने त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. याबाबत धनराज बावणेचा मुलगा कुणाल याला माहिती मिळताच त्याने चार साथीदारांच्या मदतीने जगदीश मदनेवर धारधार शस्त्रांनी वार करून त्यांची त्यांची हत्या केली. यावेळी आरोपींनी शुभमवर सुद्धा हल्ला केला. ज्यामध्ये तो जखमी झाला आहे.
आरोपींचा जुना रेकॉर्ड नाही -
या घटनेतील आरोपी कुणाल उर्फ गोलू बावणे, विक्की बावणे, बलराज कटारे आणि राजू कटारे यांचा जुना कोणताही रेकॉर्ड नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मृतक जगदीश मदने आणि शुभमचादेखील कोणताही पोलीस रेकॉर्ड नाही.
हेही वाचा - कोरोनाच्या स्थितीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर