ETV Bharat / state

नागपूर : 'हज'ला जाणाऱ्या ४३ भाविकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्याला अटक - नागपूर हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची फसवणूक

फसवणूक करणाऱ्या 'टूर ऑपरेटर'ला नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी अटक केली आहे. सज्जाद खान इस्माईल खान असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Feb 13, 2021, 6:43 PM IST

नागपूर - हज यात्रेच्या नावावर तब्बल एक कोटी 73 लाखांची फसवणूक करणाऱ्या 'टूर ऑपरेटर'ला नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी अटक केली आहे. सज्जाद खान इस्माईल खान असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर

कसाबपुरा या भागात राहणाऱ्या तौसिफ मझहर नामक व्यक्तीचे नागपूर शहरातील मोमीनपुरा परिसरात अस्मारा टूर अँड ट्रॅव्हल्स नामक कार्यालय आहे. तौसिफ हा हज-उमराह करिता लोकांना घेऊन जाणे करीता टुर्स - ट्रॅव्हल्स चालवितो. तौसिफने आरोपी सज्जाद खान इस्माईल खान याच्या मदतीने २०१८ मध्ये ३२ लोकांना हज-उमराह यात्रेकरिता पाठविले होते. त्यामुळे तौसिफचा विश्वास सज्जाद खान इस्माईल खानवर बसला होता. त्यामुळेच तक्रारदार तौसिफने त्याच्याकडे आलेल्या लोकांकडुन २०१७ ते २०१९ दरम्यानच्या काळात हज यात्रेसाठी तयार असलेल्या ४८ लोकांकडून प्राप्त झालेले १ कोटी ७३ लाख रुपये आरोपीकडे सोपवले होते. या पैशातून ४८ यात्रेकरुंच्या जाण्या-येण्याचे तिकीट आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे ठरले होते. हज-उमराह येथे पाठविणे असल्याने अंदाजे एक महिण्याअगोदर तिकीट व इतर कागदपत्रे आरोपीकडून प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने यात्रेकरूंच्या मनात शंका निर्माण झाली होती, त्यामुळे त्यांनी तौसिफकडे विचारणा करायला सुरुवात केली. त्यामुळे तौसिफने टूर ऑपरेटर सज्जाद खान इस्माईल खान यांच्यासोबत संपर्क केला, तेव्हा आरोपी सज्जाद खान हा ते पैसे घेऊन पळून गेल्याचे समजले. त्यानंतर तौसिफने या प्रकरणाची तक्रार तहसील पोलीस ठाण्यात केली होती. तहसील पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन तपास सुरू केला होता.

नाशिकमध्ये सुद्धा गुन्हा दाखल

आरोपी सज्जाद खान वल्द ईस्माईल खान याचा शोध घेत असताना पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला होता. आरोपी हा नाशिकच्या मालेगाव येथे लपून असल्याची माहिती समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. आरोपी विरूद्ध अशा प्रकारचाच एक गुन्हा पोलीस ठाणे आझानगर, मालेगाव येथे सुद्धा दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.