ETV Bharat / state

Devendra Fadnavis : सायन्स काँग्रेसमध्ये प्रतिबिंबीत व्हावी महाराष्ट्राची विज्ञान तंत्रज्ञानातील भरारी - देवेंद्र फडणवीस - Maharashtra progress in science and technology

इंडियन सायन्स काँग्रेस परिषद 3 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजीत करण्यात ( Indian Science Congress Council ) आली आहे. परिषदेच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार ( PM Narendra Modi Inaugurate ISCA ) आहे. महाराष्ट्राची विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती या माध्यमातून दाखवण्यात येत ( Maharashtra progress in science and technology ) आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 26, 2022, 2:05 PM IST

नागपूर : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत ( Indian Science Congress Council ) आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भरारी प्रतिबिंबीत ( Maharashtra Progress In Science Technology ) व्हावी. शाळा, महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थीनी यात सहभागी होतील अशी उपाययोजना करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

मान्यवर उपस्थित : उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उच्च तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु एस.आर. चौधरी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, विद्यापीठाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री करणार उदघाटन : कुलगुरु एस.आर.चौधरी यांनी सादरीकरणातून पूर्वतयारीची माहिती दिली. 3 ते 7 जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार ( PM Narendra Modi Inaugurate ISCA ) आहेत.

7 हजार शास्त्रज्ञ सहभागी होणार : इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये देशातील 7 हजार शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र अशा विविध 14 शाखांमधील नवनवीन शोध प्रबंध, प्रदर्शन, मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ विज्ञानस्नेही विद्यार्थ्यांना होईल.

सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी यंत्रणा उभारा. राज्यातील अन्य ठिकाणा वरूनही सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा. बाहेरुन येणाऱ्या प्रतिनिधींच्या निवास, प्रवासाची उत्तम व्यवस्था ठेवा. विदेशातून येणाऱ्या शास्रज्ञांच्या निवास व्यवस्थेबाबत विशेष काळजी घ्या,अशी सुचना त्यांनी केली.

विद्यापीठाला शंभर वर्ष : यावर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा हा प्रमुख कार्यक्रम समजून उत्तम प्रसिद्धी करा. या आयोजनाचे यजमान पद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राने विज्ञान, तंत्रज्ञान व सर्व क्षेत्रातील प्रगतीची भरारी प्रतिबिंबीत व्हावी याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ( Devendra Fadnavis Review Conference Preparation ) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.