नागपूर- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
हेही वाचा- उद्यापासून नागपूर कारागृहात लॉकडाऊन - अनिल देशमुख