ETV Bharat / state

सर्व मिठागरांच्या जागा केंद्राच्या अधिकारातील; मेट्रो कारशेडवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - मेट्रो कारशेडवर चंद्रकांत पाटील

मुंबई मेट्रो कारशेडच्या विषयावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सुरुवातीला आरेच्या जंगलात होणाऱ्या कारशेडवरून पर्यावरण प्रेमी आणि राजकीय पक्ष सक्रिय झाले होते. आता वर्षभरानंतर पुन्हा मेट्रो कारशेडचा मुद्दा चर्चेला आला आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Nov 3, 2020, 5:39 PM IST

Updated : Nov 3, 2020, 7:19 PM IST

नागपूर - कांजूर मार्ग परिसरातील मेट्रो कारशेडची जागा केंद्र सरकारच्या अधिकारातील आहे. ती जागा केवळ जागा केंद्राचीच नाही तर मिठागराची आहे. या ठिकाणी मेट्रो कारशेड तयार करून पर्यावरणाचे नुकसानच होणार आहे. मुळात सर्व मिठागरांच्या जागा या केंद्राच्या अधिकारातील असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. नागपूर विमानतळावर आल्यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. मुंबईतील कांजूर मार्ग परिसरात मेट्रो कारशेड तयार करण्यासंदर्भात राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगला आहे. यावर बोलताना ते म्हणाले, ती जागा केंद्र सरकारच्या अधिकारातील आहे. ती जागा केवळ जागा केंद्राचीच नाही तर मिठागराची आहे.

मुंबई मेट्रो कारशेडच्या विषयावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सुरुवातीला आरेच्या जंगलात होणाऱ्या कारशेडवरून पर्यावरण प्रेमी आणि राजकीय पक्ष सक्रिय झाले होते. आता वर्षभरानंतर पुन्हा हा मुद्दा चर्चेला आला आहे. आरेप्रमाणेच कांजूर मार्ग परिसर देखील निसर्गाच्या विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या जागेवर मेट्रो कारशेड तयार करण्याला विरोध दर्शवत ही जागा केंद्राच्या अधिकारातील असल्याचे म्हटल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते सरकारला घेरताना दिसत आहेत. आज नागपूरला आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एवढ्या घाईने का?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मार्च २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक आयोगाने अचानक घाईगडबडीत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ज्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे पाटील म्हणाले आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी मतदारांची यादी पुढे येणे अपेक्षित होते. मात्र, येथे मतदार यादीचाच पत्ता नसताना ही निवडणूक होणार कशी? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी एकूणच यावर आक्षेप नोंदवाला आहे.

महाभकास आघाडी सरकार ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करते

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण दिले होते. एवढेच नाही तर ते त्यांनी टिकवून सुद्धा दाखवले. मात्र, राज्य सरकारला ते करता येत नसल्याने त्यांची अवस्था नाचता येई ना, अंगण वाकडे, अशी झाल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे. हे सरकार लोकां-लोकांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आल्याचा आरोप त्यांनी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर करत ताशेरे ओढले आहेत.

समित ठक्करच्या माध्यमातून राज्यसरकारवर ताशेरे

राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे कुठेही दिसत नाही. तुम्ही राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासह अनेकांवर टीका करताना भान ठेवत नाही आणि आपल्याबद्दल कुणी काही बोलले तर त्याला दहशतवादी असल्यासारखी वागणूक देता, हे चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला राज्यात आणीबाणी असल्याचे जाहीर करण्याचे आवाहन दिले आहे.

सर्व मिठागरांच्या जागा केंद्राच्या अधिकारातील; मेट्रो कारशेडवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Last Updated : Nov 3, 2020, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.