ETV Bharat / state

आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, लूकआऊट नोटीस जारी करावी-नितेश राणे यांची मागणी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व मराठा आरक्षणावरून अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly winter session 2023

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 10:07 AM IST

Updated : Dec 13, 2023, 12:20 PM IST

नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवनेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणावरून घेरण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या सभागृहात ललित ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला.

Live updates

  • आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करावी. त्यांचा पासपोर्ट जमा करावा, अशी आमदार नितेश राणी यांनी मागणी केली. युवा संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नसल्यानं रोहित पवार यांनी लाठीचार्ज करून घेतल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली.
  • शिवाजी महाराज सुरतला गेले होते, म्हणून मी सुरता गेलो होतो, असे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना अपात्रता सुनावणीदरम्यान म्हटले. यावर विरोधकांनी नाराजी व्यक्ती केली आहे. गोगावले यांच वक्तव्य म्हणजे शिवाजी महाराजांबरोबर तुलना करण्यासारखं असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.
  • धारावी पुनर्विकासाबाबत विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. धारावी वाचवा आणि लघू उद्योग वाचवा असे फलक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हातात घेतले आहे. लोकांना घर मिळतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धारावीतील लोकांना घरे मिळणार का प्रश्न दोन्ही घरांमध्ये उपस्थित करणार असल्याचे आमदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. धारावी विकासाच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचा गायकवाड यांनी गंभीर आरोप केला.
  • सरकारमुळे मराठा आणि ओबीसीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आमच्या नेत्यांकडून वारंवरा जातीनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. शेक्षणिक व्यवस्थेविरोधात भाजप प्रणित सरकार आहे. मराठा-ओबीसीमध्ये वादाची ठिणगी हे राज्य सरकारचं पाप आहे, अशा जळजळीत शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. ते नागपूर विधानभवनातून माध्यमांशी बोलत आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात काय झाली चर्चा- हिवाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवशी विधानसभेत दुष्काळ, गारपीट यावरील चर्चेदरम्यान, काँग्रेस आमदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. गारपीट आणि दुष्काळामुळं शेतकरी कोलमडून गेला आहे. शेतकरी संकटात असताना सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. पण अजूनपर्यंत सरकारकडून मदत जाहीर झाली नाही. जुन-जूलै महिन्यात सरकारनं शेतकऱ्यांसाठी ४२० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पण शेतकऱ्यांना फक्त २२१ कोटी रुपयांची मदत मिळाली. सरकारची शेतकऱ्यांबाबत दुहेरी भूमिका का? असा सवालदेखील यावेळ चव्हाण यांनी उपस्थित केला. यावेळी चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे. सध्या महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येबाबत अव्वल आहे. याकडं सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे.

टोरंट वीज कंपनीची विशेष अधिकारी नेमून चौकशी करा - राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी टोरंटो वीज कंपनीबाबत हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी प्रश्न उपस्थित केला. २००७ पासून ते २०२३ पर्यंत शांतीनगर, नारपोली, भिवंडी, निजामपूरा आणि पडघा या पोलीस स्टेशमध्ये हजारो गुन्हे टोरंटो कंपनी विरोधात दाखल आहेत. वीज मंडळानं विशेष अधिकारी नेमून टोरंट कंपनीची चौकशी करणं गरजेचे आहे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. बळाचा वापर करून मिटर काढून नेणे असे प्रकार घडत असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा-

  1. राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला?-विजय वडेट्टीवार
  2. दीड वर्षात शेतकऱ्यांना १० ते १२ हजार कोटी दिले आहेत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Last Updated : Dec 13, 2023, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.