ETV Bharat / state

सुधाकर बडगुजर प्रकरणाची संपूर्ण एसआयटी चौकशी लावू- देवेंद्र फडणवीस - भाजपा आमदार अँड आशिष शेलार

Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधिमंडळ अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ऑनलाईन बेटिंग ॲपवरुन चांगलीच चर्चा झाली. आज सातव्या दिवशी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच जुन्या पेन्शन योजनेवरुनही आज गदारोळ होण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ अधिवेशनाचा सातवा दिवस
विधिमंडळ अधिवेशनाचा सातवा दिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 10:54 AM IST

Updated : Dec 15, 2023, 12:15 PM IST

नागपूर Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधिमंडळाच्या सातव्या विदशी ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची भाजपा आमदारांनी विधानसभेत मागणी केली. यावर संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी लावू, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Live updates

  • बॉम्बस्फोटातील आरोपींसह ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर होते. त्यांच्यावर कारवाई करा, अशी आशिष शेलार यांनी मागणी केली. त्यांच्यापाठोपाठ भाजपा आमदार नितेश राणे यांनी मागणी केली. सभागृहात बोलताना नितेश राणे यांनी फोटोही दाखविला.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी महादेव ॲप आणि ऑनलाईन बेटिंग ॲप यावरुन चांगलीच चर्चा झाली. यावर महादेव अँप आणि देशविरोधी गुन्हेगार असलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरविणाऱ्या शहा आणि त्यांच्या एडलवाईस कंपनीच्या व्यवहाराची येत्या दोन महिन्यात चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिलं.

अधिवेशनाच्या सहाव्या दविशी आशिष शेलारांकडून प्रश्न उपस्थित : महादेव ॲपच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात ऑनलाईन अनधिकृत बेटींग करत अनेक बेटींग ॲपच्या निर्मिती केली जात आहे. सामान्य गरीब माणसांची फसवणूक करण्यात येत असून ॲपमधील पैसे बांग्लादेशी नागरिकांचे बनावट भारतीय कागदपत्रे बनवून आर्थिक व्यवहार केले जात असल्याची माहीती आशिष शेलार यांनी सभागृहात दिली. यावर शासनास बुडविल्याप्रकरणी देय असलेला 28 टक्के सेवा व वस्तुकर चुकवल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचं सरकारनं सांगितलं. या एफआयआरमधील आरोपी अमीत शर्मा हा मुंबई बॉम्बं स्फोट हल्ल्यातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा भाऊ मुस्ताकीन याचा भागीदार आहे. या दोघांवर महादेव ॲप चालवण्याचा आरोप असून विजय जैन यांच्या जे.पी. इन्फ्रा, मुंबईतील बांधकाम व्यावसायिक कंपनीत या दोघांनी पैसे गुंतविलेले आहेत. या कंपनीचं मुंबईत गोरेगाव आणि मिरा रोड इथं काम सरु असून अंडरवर्ल्डचा पैसा बांधकाम व्यावसायात आणला गेल्याचा आरोप आमदार शेलार यांनी केला. अमीत शर्मा आणि विजय जैन यांचा मुंबईत गोरेगाव येथे सुरु असलेल्या जे पी डेक या बांधकाम प्रकल्पाला रशेश शहा यांच्या एडलवाईस या वादग्रस्त फायनान्स कंपनीने 1 हजार कोटी रुपयांचा वित्त पुरवठा केल्याचा आरोपही आमदार शेलार यांनी केलाय.

दोन महिन्यांत चौकशी करणार : यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, महादेव ॲपची ईडी मार्फत चौकशी करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरातील विविध राज्यात या गुन्ह्याची व्याप्ती असून या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलीय. विजय जैन यांच्या जे.पी. इन्फ्रा या बांधकाम व्यावसायिक कंपनी, अमित शर्मा, एडलवाईस आणि रशेश शहा यांच्या मध्ये झालेल्या संपूर्ण व्यवहारात करण्यात आलेली गुंतवणूकीचा हेतू काय आहे? हा पैसा कायदेशीर मार्गाने बँकेच्या माध्यमातून आला की काळा पैसा यामध्ये टाकण्यात आला? यामध्ये काही गैरव्यवहार आहे का? यामध्ये गुन्हेगारी संबंध आहेत का? या सगळ्याबाबत येत्या दोन महिन्यांत चौकशी करण्यात येईल, जर गैरव्यवहार आढळला तर कारवाई करण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषीत केलं.

'मागेल त्याला शेततळे' योजना अधिक व्यापक करणार : राज्यातील शेतकऱ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या 'मागेल त्याला शेततळे' योजनेतील प्रलंबित आणि रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर आमदार धीरज देशमुख यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची आकडेवारी विधानसभा सभागृहात मांडली. शेततळे मंजुरी कृषी विभाग करत असला, तरी राबविण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो, त्यामुळं दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिलं जाईल, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. धर्मांतर केल्यानंतर आदिवासी समाजाचा लाभ मिळणार का? मंत्री लोढांची महत्त्वपूर्ण घोषणा
  2. नैना प्रकल्प हा आधुनिक भांडवलदारांचा, दलाल आणि अधिकाऱ्यांची खळगी भरणारा-अंबादास दानवे

Last Updated : Dec 15, 2023, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.