नागपूर Maharashtra Assembly session day 8 - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा, अशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली आहे.
Live Updates
- सलीम कुत्ता प्रकरणावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला. एकनाथ खडसे यांनी सलीम कुत्ता याच्याबरोबर असलेले गिरीश महाजन यांचा कथित फोटो दाखविला. सलीम कुत्ता प्रकरणात महाजन यांच नाव घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. सलीम कुत्ता प्रकरणात एसआयटी चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले.
- राज्यातील तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लागत आहे. उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होण्याची स्थिती असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
- नागपूरमधील सोलार कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीच्या मालकावर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. गरिबांनी जगावं की नाही, असा प्रश्न विचारच नाना पटोले यांनी कामगारांच्या प्रश्नांकडं सभागृहाचं लक्ष वेधलं. विधानसभेत विरोधकांकडून निंदा व्यंजक प्रस्ताव येण्याची शक्यता आहेत. विरोधकांकडून मराठा आरक्षण, दूध उत्पादकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता आहे.
निंदाव्यंजक ठरावाचा प्रस्ताव आज मांडला जाणार?विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निंदाव्यंजक ठरावाचा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्षांना पत्राद्वारे पाठविला आहे. त्यांनी पत्रात म्हटले की, अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळीमुळे उद्धवस्थ झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबात ११ डिसेंबरला अल्पकालीन चर्चा करण्यात आली. राज्यात झालेली अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा एकाच वर्षात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवल्या आहेत. पीक कंपन्यांच्या मुजोरपणामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला आहे. शेतकऱ्यांना तातडीनं रोख मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे. चर्चेच्या माध्यमातून तशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारकडून कोणतेही उत्तर नाही- विधानसभेच्या प्रथा व परंपरेनुसार सभागृहात चर्चा संपल्याबरोबर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी ठोस उत्तर देणं अपेक्षित असते. मात्र, प्रस्तावार चर्चा होऊन चार दिवस उलटले तरी सरकारकडून कोणतेही उत्तर सभागृहाला देण्यात आलेलं नाही. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेली नाही. यातून शेतकऱ्यांप्रती शासनाच्या असलेल्य उदासीनतेचा हे सभागृह या ठरावातून तीव्र निषेध करीत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटलं. हा ठराव स्वीकृत करून सभागृहात मांडण्याची परवानगी द्यावी, असं निंदाव्यंजक ठरावाच्या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा-