ETV Bharat / state

CM Shivraj Singh Chavan Nagpur: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आरएसएस मुख्यालयात; सरसंघचालकांसोबत बंदद्वार चर्चा

नागपुरातील आरएसएसच्या मुख्यालयात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी सरसंघचालक यांच्यासोबत आगामी काळातील मध्यप्रदेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

CM Shivraj Singh Chavan
शिवराजसिंग चव्हाण
author img

By

Published : Feb 15, 2023, 4:23 PM IST

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण आरएसएस मुख्यालयात

नागपूर : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज सकाळी नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि मुशिवराज सिंह चौहान यांच्यामध्ये सुमारे एक तासभर बंद द्वार चर्चा झाली आहे. आगामी काळात मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याशिवाय संघटनात्मक पक्षबंधणी या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा: मध्यप्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे. शिवराज सिंह चौहान गेल्या १८ वर्षांपासून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. निवडणुकीच्या आधी संघटन आणि पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशानेच शिवराज सिंह चौहान सरसंघचालकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी संघ मुख्यालयात हजेरी लावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले याची अधिकृत माहिती कळू शकलेली नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत सखोल चर्चा झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सेमीफायनलची तयारी?: देशातील नऊ राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी म्हणजे २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुक आधी ‘सेमी फायनल’ म्हणून या नऊ राज्यांमध्ये होत अललेल्या निवडणुकांकडे बघितले जात आहे. ज्या नऊ राज्यात निवडणूका होणार आहेत, त्यापैकी मध्यप्रदेश राज्य भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने शिवराजसिंह चव्हाण आतापासूनच कामाला लागले असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणूकीच्या उद्देश्याने आतापासूनच रणनीती आखली असून त्याची अंमालबजावणीला सुरूवात झाली असल्याचे सांगितले जात आहे.

शिवराजसिंग चव्हाण आणि संघ: शिवराज सिंह चौहान हे 1972 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. स्वयंसेवक ते खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक पदे भूषवली आहे. शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळीक आहे. एवढच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आणि इतर मोठ्या स्वयंसेवकांसोबत त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

एक विचारधारा देश घडवू किंवा तोडू शकत नाही: केवळ एक विचारधारा किंवा एक व्यक्ती देश घडवू किंवा तोडू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. राजरत्न पुरस्कार समितीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ते बोलत होते.

हेही वाचा : Thackeray VS Shinde Group : महाराष्ट्रातील सत्तेचा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळेच, सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.