नागपूर Lover Couple Suicide : नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आलीय. आत्महत्या करणारे दोघेही पारशिवनी तालुक्यातील एकाच गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा तीव्र विरोध असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, अशी चर्चा गावात सुरूय. पारशिवानी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर या दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसंच तपास सुरू करण्यात आलाय.
एकाच दोरीनं गळफास घेत आत्महत्या : ते दोघंही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. पण त्यांच्यात प्रेमसंबंध होते. या बाबतीत दोघांच्या कुटुंबियांना कुणकुण लागली होती. त्यामुळे ते दोघंही मानसिक तणावात होते. रात्री उशिरा गावातील लोक झोपी गेल्यानंतर ते दोघे भेटले. त्यांनी मुलाच्या घराशेजारी बंद असलेल्या घरात जाऊन एकाचवेळी एकत्र आत्महत्या केलीय. आज सकाळपासूनच जेव्हा दोघंही घरात आढळून येत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा ते दोघे बंद घरात मृतावस्थेत आढळून आले.
पोलिसांचा तपास सुरू : एक प्रेमी युगुलानं आत्महत्या केल्याची माहिती समजल्यानंतर पारशिवनी पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतलीय. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानं सर्व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपासाला सुरुवात केलीय. (Couple Suicide In Nagpur)
कोल्हापूरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या : कोल्हापूरमध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून प्रेमी युगुलानं आत्महत्या केली होती. 'जात, धर्म पाहून प्रेम करु नका', असं त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवलं होतं. या घटनेमुळं कोल्हापुरात दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. हातकणंगले तालुक्यातीस एका तरुणाचं त्याच परिसरातील राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होतं. त्यांच्या या प्रेमसंबंधाला दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळं त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळं परिसरात तणावाचं वातावरण होतं. (Lover Couple Suicide In Nagpur)
हेही वाचा :