नागपूर - आजपासून हिवाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे. वंदे मातरमने दुपारी १२ वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर मंत्री सुभाष देसाई यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडला. त्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच सभागृहामध्ये राहुल गांधींचे नाव येताच भाजपचे नेते आक्रमक झाले. यावेळी सभागृहात 'राहुल गांधी माफी माँगो'च्या घोषणा देण्यात आल्या. शोकप्रस्ताव घेऊन शिवाजी दत्तात्रय पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधानपरिषद सभागृहातील घडामोडी :
- दु. २.४६ वा. : विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
- दु. २.४६ वा. : विधानपरिषदेमध्ये शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी शिवाजी दत्तात्रय पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
- दु. २.१९ वा. : भाजपचे सर्व आमदार आक्रमक
- दु. २.१८ वा. : सभागृहात 'राहुल गांधी माफी माँगो'च्या घोषणा
- दु. २.१७ वा. - राहुल गांधींबाबतचा विषय सभागृहात उपस्थित करण्यात आला. त्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. तसेच बॅनर घेऊन सभापतींसमोर घोषणाबाजी करण्यात आली.
- दु. 2.03 वा. - 3 पक्षातून आलो. मात्र, विचारधारा एकच असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. त्यांचे अभिनंदन करताना अनेकांनी ३ पक्षातून आले असल्याचे म्हटले होते. यालाच त्यांनी उत्तर दिले.
- दु. 1.52 वा. - प्रवीण दरेकर यांच्या २ वेळा 'मी पण सावरकर' लिहिलेली टोपी आली. मात्र, त्यांनी घातली नाही. त्यामुळे त्यांना अद्यापही दरेकरांना भाजपचे विचार पटलेले नाही. तसेच औरंगजेब देखील फावल्या वेळेत टोप्या शिवायचे, असा चिमटा जयंत पाटील यांनी भाजपला काढला.
- दु. 1.18 वा - सुभाष देसाईंनी प्रवीण दरेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला
- दु. 1.10 वा - विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा
- दु. 1.09 वा. - सुभाष देसाई यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती
- दु. 12.03 वा. - वंदे मातरमने विधान परिषदेचे कामकाज सुरू
- दु. 12.16 वा. : न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सुभाष देसाईंनी मांडला