ETV Bharat / state

दिलासादायक! नागपुरातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट

author img

By

Published : May 28, 2021, 8:01 PM IST

गेल्या २४ तासांत नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३६५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज (शुक्रवारी) १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या आता केवळ ८०९३ इतकीच राहिली आहे. महत्त्वाचे म्हणजे मे महिन्याच्या सुरूवातीला सक्रिय रुग्णांची संख्या ही ७५ हजारांच्या घरात गेली होती. ११ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ही ८८६५ इतकी झाली आहे.

नागपूर कोरोना
नागपूर कोरोना

नागपूर - उपराजधानी नागपुरात कोरोनाचे संकट आता कमी झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी नागपूरची रुग्णसंख्या पाचशेच्या आत नोंदविण्यात आली आहे. यामुळे एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नागपूरला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत नागपूर शहरात आणि जिल्ह्यात मिळून केवळ ३६५ रुग्णांची नोंद झाली आहे. आज (शुक्रवारी) झालेल्या चाचण्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६.४२ टक्के इतकी झाली आहे.

रिकव्हरी दर वाढला

गेल्या २४ तासांत नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३६५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज (शुक्रवारी) १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या आता केवळ ८०९३ इतकीच राहिली आहे. महत्त्वाचे म्हणजे मे महिन्याच्या सुरूवातीला सक्रीय रुग्णांची संख्या ही ७५ हजारांच्या घरात गेली होती. ११ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ही ८८६५ इतकी झाली आहे. आज (शुक्रवारी) दिवसभरात १६१५१ कोरोना चाचण्या करण्यात आले. ज्यामध्ये १२४६१ आरटीपीसीआर तर ३६९० रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. रुग्णसंख्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बघता नागपूरचा रिकव्हरी दर हा ९६.४२ टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा -पोलिसांची भाजपच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.