नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षाची बैठकी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह तीनही पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते. या बैठकीत विरोधकांनी सुरू केलेला गदारोळावर अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा - अधिवेशनाचा दुसरा दिवस: विरोधक सरकारला आजही कोंडीत पकडणार?
पहिल्याच दिवशी विरोधकांनी राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरुन सुरू केलेल्या गोंधळामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या बैठकीत त्या संदर्भांत रणनीती ठरवली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकी संदर्भात कॅबिनेट मंत्री जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी आमदारांना उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना दिल्याचे सांगितले.