नागपूर : मध्यप्रदेश राज्यातील छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा नुकताच आटोपलेला नागपूर दौरा प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे. बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण शास्त्रींचे पितळ उघडे पाडू यांनी सांगितले की, श्याम मानव यांनी एका सभा आयोजित केली होती. मात्र,कार्यक्रमा दरम्यान काही हिंदू संघटनेच्या प्रतिनिधींना श्याम मानव यांना प्रश्न विचारायचे होते. कार्यक्रम आटोपता आला तरी प्रश्न विचारू दिले नाहीत म्हणून श्याम मानव यांच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ झाला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
नागपुरात जाहीर सभेचे आयोजन : बागेश्वर धामचे पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे पितळ उघडे पाडण्यासाठी नागपुरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला श्याम मानव यांनी संबोधित केले. या कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती होते. कोणत्या पद्धतीने अंधश्रद्धा पसरवली जात आहे, यावर वक्त्यांनी आपले विचार मांडले. धीरेंद्र महाराज कशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवत आहेत. श्याम मानव यांनीही आपले विचार मांडले, बैठकीत काही हिंदू संघटनांना श्याम मानव यांना काही प्रश्न विचारायचे होते, पण तोपर्यंत कार्यक्रम संपला तरी त्यांना संधीच देण्यात आली नाही. तीन तास बसून सर्वांचे भाषण ऐकले पण ज्यावेळी प्रश्न विचारायची तेव्हा संधीच न दिल्याने हे कार्यकर्ते नाराज झाले होते.
जय श्रीरामचे दिले नारे : हिंदू संघटनेच्या लोकांनी जय श्री रामचे नारे दिले, त्यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेप करत हिंदू संघटनेच्या सर्वांना सभागृहा बाहेर काढले. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संत गाडगे महाराज आणि समाजसुधारकांचा जयघोष केला. तसेच गेल्या आठवड्यात नागपूरच्या रेशमबागमध्ये आयोजित रामकथेची चर्चा जोरात सुरू आहे. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने' अंधश्रद्धेचा खेळ सुरू केला होता असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास त्यांना ३० लाख देऊ असे आवाहन देखील देण्यात आले आहे.
दरबारच्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन : मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारताचे नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा दरबार गेल्या आठवड्यात नागपुरच्या रेशीमबाग मैदानावर भरला होता. धीरेंद्र शास्त्री यांचे दर्शन घेण्यासाठी आणि रामकथा ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक आले होते. रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी केला आहे.'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. या शिवाय देव-धर्माच्या नावा सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक होत असून, महाराजांवर कारवाई करण्याची मागणीही समितीने पोलिसांकडे केली आहे.