ETV Bharat / state

सिंचन घोटाळा प्रकरण एसीबीकडून काढून सीबीआयकडे द्यावे; नागपूर खंडपीठात याचिका दाखल - petition filed in bombay high court nagpur bench

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात अमरावती आणि नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

bombay high court nagpur bench
नागपूर उच्च न्यायालय
author img

By

Published : Dec 10, 2019, 3:13 PM IST

नागपूर - राज्यातील बहुचर्चित घोटाळा असलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास लाचलुचपत (एसीबी) कडून काढून केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात यावा, यासंदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सामाजिक कार्यकर्ते अतुल जगताप यांनी दाखल केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात अमरावती आणि नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुस्लिमांसोबत कुठलाही द्वेष नाही - अमित शाह

काय आहे सिंचन घोटाळा ?

1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. यामध्ये सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले. मात्र, सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली, असे निरीक्षण सरकारच्या इकोनॉमिक सर्व्हेमध्ये समोर आले होते. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. यानंतर सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात आणि त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमतता आढळली, अशी नोंद महालेखापरिक्षकने (CAG) आपल्या अहवालात केली होती. 2001 ते 2011-12 या काळात त्यांनी जलविभागाचे 7 ऑडिट केले.

त्यात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात अनिश्चितता, प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ, वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी प्रकल्प सुरू करणे याबाबतीत नियमांची पायमल्ली झाल्याचे निरीक्षण मांडले होते. तसेच अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचेही त्यांनी म्हटले.

Intro:नागपूर

सिंचन घोटाळ्याचा तपास एसीबी कडून काढून केंद्रीय संस्थाना द्यावा नागपूर खंडपीठात याचिका

सिंचन घोटाळ्याशी संबंधित तपास यंत्रणा बदलविण्यात यावी अशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा अमरावती आणि नागपूर विभागातील प्रकरणांमध्ये सहभाग नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते राज्य सरकार च्या अधिपत्या खाली येणाऱ्या तपास यंत्रणांन कडून तपास काढून टाकावाBody:आणि
सिंचन घोटाळ्याचा तपास केंद्रीय तपास संस्थेकडे द्यावा अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते अतुल जगताप यांनी याचिका दाखल केली आहे

नोट- अतुल जगताप नागपुरात नाहीत Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.