ETV Bharat / state

International Player Selling Poha : आंतरराष्ट्रीय खेळाडू फुटपाथवर विकतोय पोहे आणि बांधतोय फेटे; नागपुरातील संदीप गवईंची व्यथा - संदीप गवई नागपूर

अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा ( International Player from Nagpur ), देशासाठी अनेक पदकांची कमाई करुन परदेशात आपल्या देशाचे नावलौकिक वाढवणारा, महाराष्ट्र शासनाच्या एकलव्य पुरस्काराने ( Ekalavya Aware winner ) सन्मानित दिव्यांग खेळाडू संदीप गवई ( Divyang Player Sandip Gawai Nagpur ) यांच्यावर आज फूटपाथवर उभे राहून चहा आणि पोहे विकण्याची वेळ आली आहे.

International Player Selling Poha
आंतरराष्ट्रीय खेळाडू फुटपाथवर विकतोय पोहे
author img

By

Published : Feb 16, 2022, 3:25 PM IST

Updated : Feb 16, 2022, 4:02 PM IST

नागपूर - अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा ( International Player from Nagpur ), देशासाठी अनेक पदकांची कमाई करुन परदेशात आपल्या देशाचे नावलौकिक वाढवणारा, महाराष्ट्र शासनाच्या एकलव्य पुरस्काराने ( Ekalavya Aware winner ) सन्मानित दिव्यांग खेळाडू संदीप गवई ( Divyang Player Sandip Gawai Nagpur ) यांच्यावर आज फूटपाथवर उभे राहून चहा आणि पोहे विकण्याची वेळ आली आहे. ( International Player Selling Poha Nagpur ) यातून सुद्धा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय होत नसल्याने या खेळाडूला लग्न समारंभात जाऊन लोकांच्या डोक्यावर फेटे बांधावे लागत आहेत.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने सदीप गवई यांच्यासोबत केलेली बातचित

संदीप दिव्यांग असून सुद्धा प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिरंदाज खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संदीप यांच्या खेळाची दखल घेऊन राज्य शासनाकडून त्यांना मानाच्या एकलव्य पुरस्काराने देखील सन्मानित केले. मात्र, त्यानंतर शासनाकडूनच त्यांची उपेक्षा केली जात असल्याने आज संदीप आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत.

अर्धांगवायूने आई आजारी -

संदीप यांचा जीवन संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी राहिला आहे. आजही संधी मिळाल्यास देशासाठी खेण्याचा त्यांचा मानस आहे. इतकेच नाही तर खेळाडू घडवण्यासाठी वाटेल ती मदत करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, राज्य सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या उदासीन धोरणामुळे आज त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. दिव्यांग तिरंदाज संदीप गवईने नोकरीसाठी आठ ते दहा वर्षे शासनदरबारी उंबरठे झिजविले आहेत. मात्र, नोकरी न मिळाल्याने अखेर निराश होऊन संदीपने पोटापाण्यासाठी फूटपाथवर चहाची छोटीसी टपरी टाकली आहे. संदीप यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले व अर्धांगवायूने आजारी असलेली आई आहे. त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी सध्या संदीपवर आहे. आर्थिक अडचण व कमाईचे दुसरे साधन नसल्यामुळे नाईलाजाने संदीपला फूटपाथवर चहाची टपरी टाकावी लागली.

sandeep gawai
संदीप गवई

संदीप यांचा क्रीडा प्रवास -

तिरंदाज आणि पॉवरलिफ्टर असे दोन खेळ खेळणाऱ्या संदीप यांनी थायलंड, इटली, झेक प्रजासत्ताकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले. २०१२मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने ब्रॉंझपदक पटकाविले होते. याशिवाय अनेक राज्य स्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी पदकांची कमाई केली आहे.

हेही वाचा - बप्पीदांनी सांगितला होता किशोर कुमारच्या शेवटच्या रेकॉर्डिंगचा आनंददायी किस्सा

संदीप यांना नोकरीची अपेक्षा -

संदीप गवई यांच्या कामगिरीची राज्य शासनाने दखल घेत त्यांना प्रतिष्ठेच्या एकलव्य पुरस्काराने सन्मानित केले. आंतरराष्ट्रीय पदकविजेता खेळाडू या नात्याने त्यांनी दहा वर्षांपूर्वी २०१२ मध्ये शासकीय नोकरीसाठी राज्य शासनाकडे रीतसर अर्ज केला. मात्र, दहा वर्षांचा काळ लोटूनही अद्याप त्याच्या अर्जावर शासनाने विचार केला नाही. यादरम्यान संदीपने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत सर्वांचे उंबरठे झिजविले. वारंवार अर्ज, विनंत्या व निवेदने दिलीत. मात्र, कुणीही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही.

संदीपचा फेटे बांधण्याचा व्यवसाय -

तब्बल 10 वर्ष शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिझवल्यानंतरही संदीप यांना नोकरी मिळाली नाही. खेळासाठी बालपण आणि तारुण्य खर्च केल्यानंतरही शासन नोकरी देण्यास उदासीन असल्याने नाइलाजाने त्याने पोटा-पाण्यासाठी लग्न समारंभांमध्ये फेटे बांधण्याचा व्यवसाय सुरू करावा लागला आहे.

Last Updated : Feb 16, 2022, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.