ETV Bharat / state

संघाच्या मुख्यालयातील सुरक्षेत वाढ; आता 'CISF' जवानांकडे जबाबदारी - dr mohan bhagavat rss chief

जम्मू कश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात जास्तीची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

नागपूर संघाच्या मुख्यालयातील सुरक्षेत वाढ; आता 'CISF' जवानांकडे जबाबदारी
author img

By

Published : Aug 16, 2019, 1:54 PM IST

Updated : Aug 16, 2019, 3:03 PM IST

नागपूर - जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात जास्तीची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

नागपूर संघाच्या मुख्यालयातील सुरक्षेत वाढ; आता 'CISF' जवानांकडे जबाबदारी

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सुरक्षेत संघ मुख्यालयालाही सुरक्षा पुरवली जाते. यात सिआयएसएफ जवान सुरक्षेसाठी असतात. आज (शुक्रवारी) अजून काही जवानांची संख्या वाढवली असून येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काल (गुरुवारी) संघप्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात 'मोदी है तो मुमकीन है' असे लोक जे म्हणतात ते खरे असल्याचे म्हणत त्यांनी ३७० कलमाबाबतीत घेतलेल्या निर्णयाला दुजोरा दिला होता. यामुळे सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

संघ मुख्यालयात संघाचे मोठे नेते राहतात. तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचाही मुक्काम मुख्यालयातच असतो. त्याचप्रमाणे भाजपचे अनेक मोठे नेते देखील संघ मुख्यालयाला भेटी देतात. यामुळे हा निर्णय घेतला आहे. नागपूर पोलिसांची एक तुकडी पूर्वीपासूनच संघ मुख्यालयात तैनात आहे.

Intro:नागपूर

संघाच्या मुख्यालयातील सुरक्षेत वाढ;सुरक्षा जवनांची संख्या वाढली

नागपूर च्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील सुरक्षा वाढविण्यात आल्याची माहिती पुढे येतेय.केंद्र सरकार नि जम्मु कश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्या नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करन्यात आल्याची सूत्रांन तर्फे माहिती.संघ मुख्यालयात सुरक्षे साठी सिआयएसएफ चे जवान तैनात असतात.Body:या जवानांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याच दिसतंय. केंद्रातील अनेक मोठे मंत्र्यांची संघाशी जवळीक आहे. या निर्णयाचं संघाकडून स्वागत करण्यात आलंय.संघ मुख्यालयात संघाचे मोठे नेते राहतात. सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचाही मुख्यालयातच मुक्काम असतो तसच आणि भाजप चे अनेक बडे नेते देखील संघ मुख्यालयात भेटी देतात. नागपूर पोलीसांची क्यूआरटी ची तुकडी पूर्वीपासूनच संघ मुख्यालयात तैनात आहे.Conclusion:
Last Updated : Aug 16, 2019, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.