ETV Bharat / state

पावसाळा आला तरी नागपूरमध्ये नाले सफाईची कामे अपूर्ण - incomplete

नागपूर महानगर पालिकेने सुमारे महिनाभरापूर्वी नाले सफाईला सुरूवात केली आहे. मात्र, अद्यापही नाले सफाई पूर्ण झाली नाहीत. यावर्षी सुद्धा गेल्यावर्षीसारखी परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये नाले सफाईची कामे अपूर्ण
author img

By

Published : Jun 14, 2019, 7:25 PM IST

नागपूर - गेल्या वर्षी पावसाळ्यात नागपूरकरांनी पावसाचा हाहाकार अनुभवला होता. जागो-जागी पावसाचे पाणी तुंबल्याने शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईचे काम पूर्ण झाले नाही.

नागपूर महानगर पालिकेने सुमारे महिनाभरापूर्वी नाले सफाईला सुरूवात केली आहे. मात्र, अद्यापही नाले सफाई पूर्ण झाली नाहीत. यावर्षी सुद्धा गेल्यावर्षीसारखी परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता आहे. ज्या वेगाने शहराचे क्षेत्रफळ वाढत आहे ते बघता मूलभूत सुविधांचा अभाव नागपुरात कायमच दिसून येतो. कधी नव्हे ते यावर्षी नागपूरकर पिण्याच्या पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. उन्हाळ्याची सांगता होण्याचा मुहूर्त जवळ येत असला तरी पावसाळ्याची भीती देखील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. कारण, गेल्यावर्षी नागपूरकरांनी पावसाचा जो अनुभव घेतला होता तो यापूर्वी कधीही त्यांच्या वाटेला आला नव्हता. गेल्या वर्षी झालेल्या अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने शहराच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या अनेकांचा संसार वाहून गेला होता. एवढंच काय तर नागपुरात सुरू असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनसुद्धा पावसामुळे काही काळ ठप्प झाले होते.

नागपूरमध्ये नाले सफाईची कामे अपूर्ण

यावर्षी नागपूर महानगर पालिकेने जून महिन्याच्या सुरूवातीलाच नाले सफाईचे अभियान हाती घेतले होते. परंतू, अद्यापही नाले सफाई पूर्ण झालेली नाही. तर दुसरीकडे महापौर नंदा जीचकार या मान्सूनपूर्वची पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा करत आहेत. नाले सफाईच्या बाबतीत महापौर कितीही दावा करत असल्या तरी काम अद्यापही बरेच शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा तीच परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता आहे.

Intro:गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात नागपूरकरांनी पावसाचा हाहाकार अनुभवला होता.....जागो-जागी पावसाचे पाणी तुंबल्याने शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते...त्यावेळी नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने झाली नसल्याने सर्वच नाल्या तुडुंब भरल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता ...यावर्षी नागपूर महानगर पालिकेच्या सुमारे महिनाभर पूर्वी नाले सफाईला सुरवात केली आहे मात्र अद्यापही नाले सफाई पूर्ण झाली नसल्याने यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता आहे

Body:नागपूर शहराचा विस्तार हा चहू बाजूने होताना दिसतोय...ज्या वेगाने शहराचे क्षेत्रफळ वाढत आहे ते बघता मूलभूत सुविधांचा अभाव नागपुरात कायमच दिसून येतो...कधी नव्हे तर वर्षी नागपूरकर पिण्याच्या पाण्यासाठी भटकताना दिसला...उन्हाळाची सांगता होण्याचा मुहूर्त जवळ येत असला तरी पावसाळ्याची भीती देखील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहेच,कारण गेल्यावर्षी नागपूरकरांनी पावसाचा जो अनुभव घेतला होता तो या पूर्वी कधीही त्यांच्या वाटेल आला नव्हता...गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने शहराच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या अनेकांचा संसार वाहून गेला होता....तर अनेकांचे संसार उघड्यावर पडला होता....एवढंच काय तर नागपुरात सुरू असलेले विधिमंडळ चे पावसाळी अधिवेशन सुद्धा बाधित झाले होते...या वर्ष परिस्थिती करिता ड्रेनेज सिस्टिमवर खापर फोडण्यात आले होते...यावर्षी नागपुर महानगर पालिकेने जून महिन्याच्या सुरवातीलाच नाले सफाईचे अभियान हाती घेतले होते,परंतु अद्यापही नाले सफाई पूर्ण झालेली नाही.....पाऊस लांबला असल्याने महापालिकेने केलेली दिरंगाई जरी फावली असली तरी गेल्या वर्षीच्या अनुभवातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणता धडा घेतला असावा असे दिसत नाही आहे,तर दुसरी कडे महापौर नंदा जीचकार यांनी मान्सून पूर्वची पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा करत आहेत...नाले सफाईचे बाबतीत महापौर कितीही दावा करत असल्या तरी काम अद्यापही बरेच शिल्लक आहे,त्यामुळे यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती नागपूरकरांवर ओढवण्याची शक्यता आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.