ETV Bharat / state

14 तालुक्यात मागील 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही, नागपूरकरांना मोठा दिलासा

author img

By

Published : Jun 6, 2021, 1:48 AM IST

नागपूरकर आता कोरोनामुक्त मार्गावर आहेत. नागपूर ग्रामीण भागात 14 तालुक्यांत मागील 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही, हे चित्र मोठा दिलासा देणारे चित्र आहे.

14 तालुक्यात मागील 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही, नागपूरकरांना मोठा दिलासा
14 तालुक्यात मागील 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही, नागपूरकरांना मोठा दिलासा

नागपूर - नागपूरकर आता कोरोनामुक्त मार्गावर आहेत. कोरोनाची परिस्थिती दिवसगणीत सुधारत असताना नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकही मृत्यू नाही. अशी परिस्थिती या दुसऱ्या लाटेतील पहिलाच दिवस आहे. काही दिवसांपूर्वी एक मृत्यू झाला होता. नागपूर ग्रामीण भागात 14 तालुक्यात मागील 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद नाही हे चित्र मोठा दिलासा देणारे चित्र आहे.

10 हजार लोकांची चाचणी

शनिवारी कोरोनाबाबतचा अहवालात आला. त्यामध्ये 10 हजार 13 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 197 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरी भागात 123 तर, ग्रामीण भागातील केवळ 71 बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तसेच 6 जण दगावले आहे. यामध्ये शहरी भागात 3, तर ग्रामीण भागात शून्य मृत्यूची नोंद आहे. जिल्हाबाहेरील 3 जण दगावले आहेत. तसेच 471 जणांपैकी शहरात 349 तर ग्रामीण 122 जण कोरोना मुक्त झाले आहेत. यात 1586 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून, 2 हजार 709 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

रिकव्हरी रेट हा 97.22 टक्क्यांवर

आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे. 4 हजार 295 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 75 हजार 597 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. 4 लाख 62 हजार 352 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये मृत्यूचा आकडा हा 8 हजार 949 इतका झाला आहे. नागपूरमध्ये सध्या रिकव्हरी रेट हा 97.22 टक्क्यांवर पोहचला आहे.

सहा जिल्ह्यात 30 जण कोरोनाचे बळी

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 1 हजार 133 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात 487 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 30 जण हे कोरोना आजराचे बळी ठरले आहे. यामध्ये बाधितांच्या तुलेनेत 646 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहेत. यामध्ये नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा दर 2.0 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 2.33 वर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.