नागपूर - नागपूर ग्रामीण पोलिसांना दरोडा आणि खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळाले असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नरेश कुरुडकर नामक शेत गड्याचा खून करून फॉर्महाऊस मध्ये ठेवलेली मोठी रक्कम आरोपींनी लंपास केली केली होती. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्व करण्यात आलेल्या तपासात अविनाश नरुळे आणि राकेश महाजन या दोघांनी संगनमत करून नरेशचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरातील ३७ लाख रुपये जप्त केले आहेत.
ज्ञानेश्वर फुले नामक वकिलाचे कुही येथील मांगली शिवारात शेती आणि फॉर्महाऊस आहे. शेतीची देखरेख करण्यासाठी नरेश दशरथ कुरूडकर यांना दिली होती. दरम्यान २० जून रोजी ज्ञानेश्वर फुले हे त्यांच्या पत्नीसह शेतावर गेले होते. त्यावेळी त्यांना शेतावर काम करणारा नरेंश कुरुडकरचा मृतदेह दिसून आला. या घटनेची तक्रार कुही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचवेळी फ्रॉम हाऊस मध्ये असलेली रक्कम सुद्धा चोरीचा गेल्याचं उघड झाले होते. चोरीच्या उद्देशाने आलेल्या आरोपींनी हे कृत्य केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा फ्रॉम हाऊस मध्ये पैसे ठेवलेले असणाऱ्या व्यक्तीनेच दरोडा टाकून नरेशचा खून केल्याचा अंदाज बांधण्यात आला. तेव्हा पोलिसांनी शेतावर काम करणाऱ्या काही लोकांची चौकशी केली. तेव्हा अविनाश नरुळे आणि राकेश महाजन यांच्यावर पोलिसांना संशय आला. त्याची खास चौकशी केली तेव्हा आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
आरोपींकडून ३७ लाख रुपये जप्त
ज्ञानेश्वर फुले यांच्या फ्रॉम हाऊस मधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली या संदर्भात संभ्रम आहे. मात्र पोलिसांनी अविनाश नरुळे आणि राकेश महाजन या दोन आरोपींकडून ३७ लाख रुपये जप्त केले आहेत.