ETV Bharat / state

बेळगावमध्ये मराठी माणसाचा विजय तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव - फडणवीस - देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडलेला आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते चिपी विमानतळ उद्घाटन होणार आहे. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला असताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चिपी विमानतळाचे श्रेय हे नारायण राणे यांनाच असल्याचे वक्तव्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 8, 2021, 4:21 PM IST

नागपूर - बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा मराठी माणसाचा पराभव असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. बेळगावचा निकाल म्हणजे मराठी माणसाचा विजय असून हा शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटल आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पत्रकरांसोबत बोलत होते.

बोलताना देवेंद्र फडणवीस

गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करू

आगामी काळात होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोवा राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. गोवा सरकारने केलेल्या कामच्या जोरावर तेथील जनता पुन्हा भाजपला सत्ता देईल, असेही ते म्हणाले. त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या योगी सरकारचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले आहेत. योगी सरकारने सर्व समाजाच्या विकासासाठी काम केले असल्याचे ते म्हणाले आहेत.

मनोहर पर्रिकरांची कमतरता जाणवणार

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच गोवा विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची अनुपस्थिती प्रचंड जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

चिपी विमानतळाचे श्रेय राणे यांनाच - फडणवीस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडलेला आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते चिपी विमानतळ उद्घाटन होणार आहे. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला असताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चिपी विमानतळाचे श्रेय हे नारायण राणे यांनाच असल्याचे वक्तव्य केले आहे. यात श्रेयवादाची लढाई नसून कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सामंजस्याने सर्व वाद सोडवले पाहिजे असेही ते म्हणाले.

कायद्याचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्या

वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव आणि एका तरुणीचा लग्नावरून वाद सुरू आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझे तडस यांच्यासोबत बोलणे झाले असून या प्रकरणात कायद्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले आहेत.

तब्बल 36 जागा जिंकत बेळगावात भाजपची सत्ता

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारूण पराभव झाला असून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महापालिकेच्या एकूण 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने तब्बल 36 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने 9 तर 10 जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. यामध्ये एमआयएमचा सुद्धा 1 उमेदवार निवडून आला आहे. दरम्यान, सत्तेचा दावा करणारी एकीकरण समिती चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे.

हेही वाचा - अभिनेता संजय दत्तने शेअर केले नितीन गडकरींसोबतचे फोटो, लिहिला 'हा' संदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.