ETV Bharat / state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत - डॉ. नितीन राऊत

नागपुरमधील जनतेने शासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. या १५ दिवसांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना आणखी बळकट कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली. विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर जिल्ह्यातील कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारा - डॉ. नितीन राऊत

author img

By

Published : Jun 1, 2021, 1:13 AM IST

नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील १५ जून पर्यंत राज्यातील कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. नागपुरमधील जनतेने देखील शासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये. या १५ दिवसांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना आणखी बळकट कराव्यात अशी सूचना, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली. विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर जिल्ह्यातील कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी.एस.सेलोकार,आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, टास्क फोर्सचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.

'काय सुरू असणार'

आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे पुढील १५ दिवसांचे नियोजन करण्याचे घोषित करण्यात आले. यामध्ये नागपूरमधील पुढील पंधरा दिवसाचे नियोजनही शासनाच्या नियमाप्रमाणेच राहील. यामध्ये प्रामुख्याने सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू असतील, यापूर्वी ही दुकाने ७ ते ११ या काळात सुरु होती. मात्र, मॉल बंद असेल. जीवनावश्यक वस्तूंची सोडून (नॉन ऐसेन्सियल, स्टॅड अलोन) अर्थात एकटी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. शनिवार, रविवार फक्त अत्यावश्यक दुकाने सुरू असतील. या दोन दिवसांत कडक निर्बंध राहतील, असे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले आहे.

'खाजगी कार्यालये बंद असतील'

कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी सर्व दुकाने सात दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 सुरु असतील.
खाद्य पदार्थ, मद्य- ई कॉमर्स व आवश्यक सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री 11 पर्यंत सुरू राहील. माल वाहतूक सुरू असेल. तथापि, मार्निंग वॉक, आऊट डोअर स्पोर्टस बंद असेल. सर्व सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थितीत सुरू असेल. सर्व खाजगी कार्यालये बंद असतील. सबळ कारणाशिवाय दुपारी 3 नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील. दुकाने सकाळी सात ते दोन पर्यंत सुरू असतील, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.