ETV Bharat / state

भाजपा-संघ परिवाराची महत्वाची बैठक; लोकसभा, विधानसभा निवडणुकांची 'स्ट्रॅटेजी' ठरली? - लोकसभा मतदारसंघाचा आढावा

BJP And RSS Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीची (lok Sabha Election Strategy) रणनीती निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सोमवारी (15 जानेवारी) नागपुरात बैठक पार पडलीय.

BJP And RSS Meeting
भाजप आणि आरएसएसची बैठक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 7:10 PM IST

Updated : Jan 15, 2024, 7:21 PM IST

नागपूर BJP And RSS Meeting : कायम इलेक्शन मोडवरचं असणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची सोमवारी नागपुरात महत्वपूर्ण बैठक पार (Important Meeting BJP And RSS) पडली. सुमारे सहा तास ही विशेष बैठक चालली आहे. विदर्भातील सर्वच लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. रविवारी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला होता.

सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा : नागपुरातील रेशीमबाग परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सोमवारी सकाळपासून ही बैठक सुरू होती. या बैठकीत विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे.

बलस्थान आणि कमजोरीचा आढावा : प्रत्येक लोकसभेच्या क्षेत्रानुसार तिथले वर्तमान राजकीय समीकरण काय? भाजपाची स्थिती कशी आहे? निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपाचं बलस्थान काय? कोणत्या कच्च्या दुव्यांकडं लक्ष द्यायचं आहे? यचा सखोल आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे.

२०१९ प्रमाणे २०२४ मध्ये आढावा : २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या स्थितीचा टप्प्या टप्प्याने ठिकठिकाणी बैठक घेऊन आढावा घेण्यात आला होता. त्याच पद्धतीनं यावर्षीही लोकसभा निवडणुकांपूर्वी संघ परिवारातील सर्व संघटनांना एकत्रित बसवून आढावा घेतला जात आहे.

राम मंदिर जल्लोषाचा आढावा : 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. देशभरात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी काय करावं, ठिकठिकाणी राम मंदिराचा जल्लोष करण्यासाठी काय नियोजन आहे? याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा -

  1. उद्धव ठाकरेंची मंगळवारी 'महापत्रकार परिषद'; आशिष शेलार म्हणाले 'बालिशपणा'
  2. 'वऱ्हाड निघालं दावोसला'; दावोसला एवढी लोकं कशासाठी? आदित्य ठाकरेंचा सवाल
  3. Nitin Gadkari in Bhandara: काँग्रेसने मागील 60 वर्षात केलेल्या कामाच्या दुप्पट कामे आम्ही 9 वर्षात केली- नितीन गडकरी

Last Updated : Jan 15, 2024, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.