ETV Bharat / state

नागपूरात अवैध दारू विक्रेते व समर्थकांचा पोलिसांवर हल्ला - नागपूरात अवैध दारू विक्रेत्यांचा पोलिसांवर हल्ला

नागपूरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत "टोली" या वस्तीत अवैध दारु विरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिस पथकावर अवैध दारु विक्रेते आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यात नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकाची गाडी फोडण्यात आली आहे.

Illegal-liquor-seller-attack-police-in-nagpur
नागपूरात अवैध दारू विक्रेते व समर्थकांचा पोलिसांवर हल्ला
author img

By

Published : May 4, 2021, 8:41 AM IST

नागपूर - अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत टोली वस्तीत अवैध दारु विरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिस पथकावर अवैध दारु विक्रेते आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यात नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकाची गाडी फोडण्यात आली आहे.

अजनी पोलीस स्टेशनचे एक पथक सोमवारी नागपूरच्या कुख्यात टोली नावाच्या वस्तीमध्ये अवैध दारू विरोधात कारवाई करायला गेले होते. संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास पोलिस पथक त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अवैध दारू विकणारे आणि त्यांच्या काही समर्थकांनी अचानक पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक झाली तेव्हा पोलिसांची संख्या कमी आणि हल्ला करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांना मागे यावे लागले. त्याच वेळी जमावाने पोलिसांच्या गाडी फोडली.

Illegal liquor seller attack police in Nagpur

टोळी वस्तीत पोलीस बंदोबस्त तैनात

या घटनेनंतर अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी वस्तीत मोठ्या प्रमाणावर पोलिस पथक पाठविण्यात आले आहे. ते सध्या पोलिसांवर दगडफेक करत हल्ला करणाऱ्या आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत, मात्र सध्या स्थिती नियंत्रणात असून परिसरात तणाव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.