ETV Bharat / state

नियमांचे अन् वेळेचे पालन करा, पहिल्याच दिवशी मुंढेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

राज्य शासनाने 21 जानेवारीला 22 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढेंचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.

ias officer tukaram mundhe
तुकाराम मुंढे
author img

By

Published : Jan 28, 2020, 11:52 AM IST

Updated : Jan 28, 2020, 1:46 PM IST

नागपूर - मला घाबरू नका, प्रामाणिकपणे कामे करा, बैठकांना वेळेवर या, नियमांचे कोटेकोर पालन करा, अशा सूचना आज नागपूरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार आज (दि. 28 जानेवारी) सकाळी साडेनऊ वाजता स्वीकारला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पालिकेतून मेट्रो लोकार्पण सोहळ्याला जाताना आयुक्त मुंढे

तुकाराम मुंढे यांच्या कामाची पद्धत, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, वेळेला महत्त्व देणे, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणे या स्वभावामुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. बैठक संपल्यानंतर मेट्रोच्या लोकार्पण सोहळा असल्याने त्या कार्यक्रमाला ते निघून गेले.

हेही वाचा - तुकाराम मुंढे यांच्यामुळे नागपूर मनपाची विशेष सभा रद्द, वाचा कारण...

राज्य शासनाने 21 जानेवारीला 22 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढेंचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्याआधी ते एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर कार्यरत होते.

हेही वाचा - 'बहीण म्हणून विनंती करतो, पंकजा मुंडेंनी 6 महिने सरकारला वेळ द्यावा'

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 28, 2020, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.