ETV Bharat / state

कामाचे आमीष दाखवून गुजरामध्ये विक्री, बळजबरीने लग्न अन् सामूहिक बलात्कार; तीन लेकरांच्या आईची करुण कथा - Human Trafficking Case

Human Trafficking Case: महिलेने एका पीडित महिलेला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला गुजरातमधील राजकोट येथे नेले. (Sale of woman in Gujarat) यानंतर तिचे एका सफाई कामगाराशी बळजबरीने लग्न लावून दिले. येथे पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. वाचा काय आहे पूर्ण प्रकरण.

Human Trafficking Case
सामूहिक बलात्कार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 9:33 PM IST

नागपूर Human Trafficking Case : शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेला काम मिळवून देतो असं खोटं सांगून थेट गुजरातच्या जामनगर येथे नेऊन तिची विक्री केली. (gang rape with woman) त्यानंतर त्या महिलेचे सफाई कामगारासोबत लग्न लावून देत तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (Nagpur Crime)

काटोलला जायचे सांगून गुजरातला नेले : या प्रकरणातील फिर्यादी महिला आणि इतर २ मुली (वय अंदाजे १७ वर्षे) यांना आरोपी महिला नंदा पौनिकर हिने फसवले. काटोल येथे एका महिलेची प्रसुती झाली आहे. त्याठिकाणी काम करण्यास जायचे आहे, असे खोटे सांगून फिर्यादी महिला, तिची ४ वर्षीय मुलगी आणि इतर दोन मुली यांच्यासह २५ जुलै, २०२३ रोजी रेल्वेने काटोल येथे जाण्यासाठी रेल्वेने निघाले.

धमकी देऊन गुजरातला नेले : आरोपी सोबत रेल्वेने जात असताना चालत्या ट्रेनमध्ये आरोपी महिलेने फिर्यादी महिलेचा मोबाईल काढून घेतला आणि तिला "जास्त बोलू नको, चुपचाप बस, नाहीतर तुझ्या ४ वर्षीय मुलीला मारून टाकीन" अशी धमकी दिली. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी राजकोट गुजरात येथे पोहचले होते.

बळजबरीने लग्न लावून बलात्कार : आरोपी महिलेने पीडित महिलेला राजकोटमध्ये कोर्ट परिसरात नेऊन तिचे एका सफाई कामगारासोबत लग्न लावून दिले आणि स्टॅम्प पेपरवर अंगठे घेतले. यानंतर आरोपी मंगला फिर्यादीच्या चार वर्षीय मुलीला कुठेतरी सोबत घेऊन गेली. पुढे आरोपी संतोष सोबत कलावाड याच्यासोबत पीडित महिलेला नगर नाका, जामनगर, गुजरात येथे पाठविले. फिर्यादी सोबत आरोपी संतोषचे दोन भाऊ गोलु आणि प्रतीक यांनी दिनांक २६ जुलै २०२३ ते दिनांक ०७ डिसेंबर २०२३ दरम्यान वारंवार बलात्कार केला. तसेच फिर्यादीच्या अल्पवयीन पीडित मुलीस यातील आरोपी दुसऱ्या एका महिलेने मोबाईल देऊन आणि वारंवार तिला बाथरूममध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले.

फिर्यादीच्या नवऱ्यासोबत मारामारी : फिर्यादी महिलेच्या नवऱ्याने जेव्हा आरोपी नंदा पौनीकरला पत्नीबाबत जाब विचारला असता, नंदा पौनिकर हिचा नवरा यादवराव पौनिकर याचे त्याच्या सोबत वादविवाद करत मारामारी केली. यानंतर पीडित नवऱ्याने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. याआधारे १७ डिसेंबर २०२३ रोजी कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : पीडित फिर्यादी महिला ही तिच्या मुलीसोबत नागपूर येथे परत आल्यानंतर, तिने तिच्यासोबत घडलेली हकीकत पोलीस आयुक्तांना सांगितली. तेव्हा पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे अधिकारी संकपाळ यांनी चौकशी करून या घटनेमध्ये एकूण ६ आरोपी असल्याचे निष्पन्न केले. त्यांच्या आदेशावरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ३६३, ३६५, ३७०, ३७६ (२) (एन), ३७६ (ए) (बी), ५०६ (ब) भादंवि., सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला गेला. पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहेत.

हेही वाचा:

  1. भाजपाच रणछोडदास, राम मंदिर उद्‌घाटनाचं निमंत्रण नसल्यानं संजय राऊतांचा भाजपाला टोला
  2. राम मंदिराच्या उद्घाटन दिनी सार्वजनिक सुट्टी हवी, संतांची केंद्र सरकारकडे मागणी
  3. कसा झाला राष्ट्रवादीत राजकीय भूकंप? अजित पवारांच्या बंडखोरीमागं कुणाचा हात?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.