ETV Bharat / state

Amit Shah Nagpur Visit : अमित शाह यांची नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपुरच्या दीक्षाभूमीला भेट दिली. नागपूरहून ते दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत.

author img

By

Published : Feb 18, 2023, 8:26 AM IST

Updated : Feb 18, 2023, 3:20 PM IST

Amit Shah
अमित शाह

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे आमदार व खासदार हजर होते. अमित शहा यांनी दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी मोजक्याचं लोकांना दीक्षाभूमीत प्रवेश देण्यात आला. तसेच पत्रकारांच्या प्रवेशावरही बंदी घातली होती. अमित शाह दीक्षाभूमीला भेट देऊन रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृति मंदिराला भेट देतील आणि पुष्प अर्पण करतील. एका वृत्तपत्र समूहाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते तेथून पुण्याला रवाना होतील.

पुण्यात पुस्तकाचे प्रकाशन : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात येत आहेत. अमित शाह यांच्या हस्ते पुण्यातील आंबेगाव येथील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे. 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम डिपी रोड वरील पंडित फार्म वर होणार आहे.

गिरीश बापट यांची भेट घेणार : अमित शाह हे कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात येत आहेत, असं सांगितलं जात आहे. महाशिवरात्री निमित्ताने शाह हे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर येथे भेट देऊन आरती देखील करणार आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असून विविध नेते मंडळी हे त्यांची भेट घेत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज पुणे दौऱ्यावर असल्याने ते देखील आज बापट यांची भेट घेणार आहेत.

पुण्याहून कोल्हापूरला जाणार : अमित शाह हे आज दुपारी पुण्यात येतील. त्यानंतर ते सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते काश्मीर मध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत संवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सायंकाळी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर शाह हे ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेणार आहेत. शाह यांचा आज पुण्यातच मुक्काम आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यानंतर शाह दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापूर शाह यांची सासुरवाडी असून तेथे दोन दिवस विविध सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा : १८ फेब्रुवारी, दुपारी २.३५ वाजता, पुणे विमानतळ तेथून २.५० वाजता सिंहगड कॉलेजच्या हेलिपॅडवर आगमन ; १८ फेब्रुवारी, दुपारी ३ वाजता, सहकार परिषद, दैनिक सकाळ, हॉटेल टीप टॉप, वाकड ; १८ फेब्रुवारी, संध्याकाळी ५ वाजता - काश्मीर मध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत संवाद, जे डब्ल्यू मेरीयेट, एस बी रोड ; १८ फेब्रुवारी, संध्याकाळी ७. ४५ वाजता - 'मोदी ॲट ट्वेन्टी' पुस्तक प्रकाशन, पंडित फॉर्म्स, डी पी रोड ; १८ फेब्रुवारी, रात्री ९ वाजता - ओंकारेश्वर मंदिर दर्शन ; १८ फेब्रुवारी, रात्री ९.२५ वाजता - खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी भेट ; १९ फेब्रुवारी, सकाळी ११ वाजता - शिवसृष्टी लोकार्पण सोहळा, आंबेगाव, पुणे ; १९ फेब्रुवारी दुपारी १.३० वाजता - पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना.

Last Updated : Feb 18, 2023, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.