नागपूर - भारतीय जनता पक्षाने आज विदर्भाच्या वर्धा येथे प्रचाराचा नारळ फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा असल्याने हजारोंची गर्दी उसळणार हे स्वाभाविक असताना गर्दीच्या संख्येवर उन्हाचा परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सर्व शंका-कुशंकांना छेद देत मोदींच्या सभेला नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.
मोदींच्या या सभेला २०१४ साली झालेल्या जाहीर सभेत पेक्षाही जास्त गर्दी उसळण्याचे चित्र बघायला मिळाले. आज वर्धामध्ये तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता. पण निवडणुकीचे तापमान वाढत चालले आहे. रणरणत्या उन्हातही नागरिकांची गर्दी विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या मनात धडकी भरावणारी होती. उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते मोदींना एकण्यासाठी आले होते.