ETV Bharat / state

Heat Wave In Vidarbha : विदर्भात उष्णतेची लाट, महाराज बागेतील प्राण्यांसाठी लावले कुलर - coolers for animals installed in Zoological Museum

विदर्भात उष्णता दिवसेंदिवस वाढतच आहे. नागपुरातील महाराजबाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांसह पक्षांसाठी कुलर लावण्यात आले आहेत. महाराजबागमध्ये आजच्या स्थितीत एकूण 400 पशु आणि पक्षी आहेत. यामध्ये 2 वाघ,4 बिबट,4 अस्वल,11 नीलगाय 13 काळवीट, 33 चितळ सह विविध जातींचे 300 पक्षी आहेत.

Heat Wave In Vidarbha
Heat Wave In Vidarbha
author img

By

Published : May 16, 2023, 5:47 PM IST

, महाराजबागेतील प्राण्यांसाठी लाववे कुलर

नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने महाराजबाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसह पक्षांसाठी कुलर लावण्यात आले आहेत. सध्या नागपूरचे तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस पर्यत पोहोचले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होतं आहे. अश्या परिस्थिती वन्य प्राण्यांचे आणि पक्षांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळेचं महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासनाने उपाय योजना करण्यात सुरुवात केली आहे. सध्या 4 कुलर बसवण्यात आले असले तरी गरजेनुसार आणखी कूलर वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राण्यांवर रोज दिवसातून दोन वेळा पाण्याचा मारा केला जातं आहे.

नागपूरसह संपूर्ण विदर्भात सरासरी तापमान : ४२ ते ४५ डिग्रीपर्यंत पोहचले आहे. वाढत्या प्रखर उन्हामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हाचे चटके सहन होत नसल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. अशा परिस्थिती पशु,पक्षी आणि वन्य प्राण्याची अवस्था फारच बिकट होते. हीच बाब लक्षात घेऊनचं नागपूरच्या प्रसिद्ध महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या शरीराचे तापमान सामान्य ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे प्राण्यांच्या पिंजऱ्यात कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. बिबट,अस्वल आणि चिडिया घरात सुद्धा कुलर बसवण्यात आले आहेत. तर वाघांसाठी त्यांच्या पिंजऱ्यात छोटे छोटे तळे तयार करण्यात आले आहेत.

प्राण्यांचे पिंजरे ग्रीन नेटने कव्हर : महाराजबाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना भीषण गर्मीत गार-गार वाटावे याकरिता विशेष व्यस्था केली आहे. सध्या चार कुलर लावण्यात आले असून गरज भासल्यास कुलरची संख्या वाढविण्यासाठी येईल. याशिवाय प्राण्यांच्या बॅरेकला ग्रीन नेटने कव्हर करण्यात आले आहे. प्राण्याच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी प्राण्यांना जुसी फ्रुट,ग्लुकोज दिले जात असल्याची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे अधिकारी अभिजित मोटघरे यांनी दिली आहे.

एप्रिल महिन्यात कुलरची गरज नव्हती : एरवी एप्रिल महिन्यातचं कुलर बसवण्यात येते मात्र,यावर्षी एप्रिल महिन्यात तब्बल २२ दिवस पाऊस पडल्यामुळे कुलर उशिरा लावण्यात आले असल्याची माहिती महाराजबाग प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराजबागमध्ये असलेले प्राणी : महाराजबाग हे मध्यभारतातील सर्वात प्रसिध्द प्राणी संग्रहालय असल्याने इथे दररोज हजारो प्राणी प्रेमी येतात. महाराजबागमध्ये आजच्या स्थितीत एकूण 400 पशु आणि पक्षी आहेत. यामध्ये 2 वाघ,4 बिबट,4 अस्वल,11 नीलगाय 13 काळवीट, 33 चितळ सह विविध जातींचे 300 पक्षी आहेत.

हेही वाचा

  1. Trimbakeshwar Temple closed : त्र्यंबकेश्वर मंदिर जानेवारी महिन्यातील 'या' तारखेपर्यंत राहणार
  2. Nashik Trimbakeshwar Temple: मंदिरातील पिंडीवर बर्फ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अंनिसने आवाहन
  3. Sri Kshetra Trimbakeshwar : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी; चला तर मग आपणही घेऊया दर्शन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.