नागपूर : वाशीमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिशाभूल करण्याचा; तसेच ईडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा यांनी केला. ते नागपुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, सारडा यांनी भावना गवळी यांची ईडीकडे तक्रार केली आहे.
भावना गवळींनी माफी मागावी - सारडा
तसेच, 'माझ्या जीवाला धोका आहे. जर माझा खून झाला तर त्याला खासदार भावना गवळी जबाबदार असतील', असाही आरोप सारडा यांनी केला आहे. 'बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखाना अवसायनात काढून शंभर कोटी रुपयांचा कारखाना अवघ्या पंचवीस लाख रुपयात स्वीय साह्यकाच्या नावावे खरेदी केला आहे. या प्रकरणात ईडीला तक्रार देऊन भावना गवळी यांच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी सारडा यांनी केली आहे. यानंतर ईडीने दखल घेत कारखान्याशी संबंधित 9 लोकांवर धाड टाकली. त्याची चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान खासदार भावना गवळी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या नावाने दोन-तीन संस्था आहेत, अशी माहिती देऊन दिशाभूल केली. पण प्रत्यक्षात त्यांचा संबंध 7 कंपन्यांशी आहे. 11 वेगवेगळ्या संस्था आहेत. यामुळे शरद पवार साहेब यांनी भावना गवळी यांच्या समर्थनात ईडीकडून विनाकारण त्रास देण्याचे काम सुरू आहे, असं वक्तव्य केलं आहे. पण प्रत्यक्षात भावना गवळी यांनी शरद पवार यांची, मतदारांची चुकीची माहिती दिली म्हणून माफी मागितली पाहिजे', अशी मागणी हरीश सारडा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
बाळासाहेब पाटलांनाही कोर्टात खेचणार - सारडा
तसेच 'याच कारखान्याच्या संबंधात राजकीय हेतूने 2011 मध्ये जनहित याचिका टाकून चौकशी करण्याची मागणी केली. या संदर्भात चौकशी लावण्यात आली. जिल्हा उपनिबंधक यांनी अहवाल सादर करून नागपुर खंडपीठात सादर केला आहे. यामुळे नव्याने नेमलेली चौकशी समिती रद्द करावी, असे पत्र खासदर भावना गवळी यांनी सहकार मंत्री यांना लिहले. यामुळे ही चौकशी रद्द करण्यात आली. पण असा निर्णय घेतला जात असताना योग्य चौकशी न करता कुठल्याही पुराव्याच्या आधारे ही चौकशी समिती रद्द केली, असा जाब सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना हायकोर्टात विचारणार आहे', असेही सारडा म्हणाले.
माझा खून झाल्यास भावना गवळीच जबाबदार असणार - सारडा
'मी तक्रार केल्यापासून माझा जीवाला धोका आहे. भावना गवळी यांचे गुंड रोज माझ्या घरी येऊन कुटुंबात आई बाबा यांना त्रास देत आहेत. या संबंधी स्थानिक पोलिसांकडे तक्रार सुद्धा केली आहे. सुरवातीला सुरक्षा दिली होती. पण खासदार भावना गवळी यांच्या दबावातून ती सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यामुळे माझा जर खून झाला तर याला भावना गवळीच जबाबदार असतील', असाही आरोप सारडा यांनी केला आहे.
सारडा यांचा भावना गवळींना इशारा
'त्यांना वाटत असेल की मला संपवले तर भ्रष्टाचाराचे प्रकरण बंद होईल. पण तसे होणार नाही. स्थानिक पोलीस जीवाची भीती दाखवत आहेत. मी महाराष्ट्र सोडेन, त्या खासदारकीचा राजीनामा देणार का?', असा इशारा हरीश सारडा यांनी दिला आहे. सारडा यांच्यावरही खंडणीची गुन्हे दाखल असल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले. 'माझ्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. त्याची तक्रार भावना गवळी यांच्याशी संबंधित प्रकारणांशी आहे. यासोबतच जर 2021 पूर्वी कुठले गुन्हे दाखल असतील तर मी महाराष्ट्र सोडले पण त्यांना चुकीची माहिती देण्याची सवय आहे. भावना गवळी खासदारकीचा राजीनामा द्यावा', असेही सारडा यांनी म्हटले.
हेही वाचा - गडी काय ऐकायला तयार नाही, महापौरांसह माजी खासदारांवरही भडकला