नागपूर - 'पर्यावरणपूरक विकास हाच शाश्वत विकास आहे. निसर्गचक्र अबाधित राखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी जाणीव ठेवून वृक्षारोपण करणे गरजेचे आहे', असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज (13 जून) केले. भास्कर वृत्तपत्र समुहातर्फे सुरु करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ आज राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. नागपूर शहरातील अशोकनगर भागात हा कार्यक्रम झाला.
'कमी वृक्ष लावा, पण...'
'अनेक वृक्ष लावण्यापेक्षा कमी वृक्ष लावा. मात्र, त्याचे व्यवस्थित संर्वधन झाले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजेत', असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.
'ऑक्सिजनचे महत्त्व समजले'
'सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीत ऑक्सिजनचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा नैसर्गिक स्त्रोत असलेल्या वृक्षांचे मातेच्या ममतेने संवर्धन केले पाहिजे. तेव्हाच वृक्षारोपणाचा खरा हेतू साध्य होईल. वेद-उपनिषदातही वृक्षांचे महत्त्व नमूद केले आहे. या मोहिमेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासह तिचे सुव्यवस्थित संनियंत्रण होण्याची गरज आहे', असे राज्यपालांनी म्हटले.
हेही वाचा - घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात; पाहा व्हिडिओ