ETV Bharat / state

खंडणी वसुलीसाठी वाहनांसह दुकानांची तोडफोड; आरोपींचे कृत्य सीसीटीव्हीत कैद - गणेशपेठ

शहरात सोमवारी मध्यरात्री एक कुख्यात गुंड व त्याच्या टोळक्याने गणेशपेठ परिसरातील विविध भागातील डजनभर वाहनांची, अनेक दुकानांची तोडफोड केली. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असुन पोलीस फुटेजच्या मदतीने तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा शोध घेत आहेत.

वाहनांची तोडफोड
author img

By

Published : Jul 17, 2019, 2:20 PM IST

नागपूर - शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, दररोज नवनवीन घटना घडतच आहेत. अशीच एक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुंडांच्या एका टोळीने सोमवारी मध्यरात्रीपासून ते मंगळवारी पहाटेपर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात धुमाकूळ घातला होता. हा सगळा प्रकार सीसीटिव्हीममध्ये कैद झाला असून एका कुख्यात या गुंडाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने वाहनांची नासधूस केली असल्याचे बोलले जात आहे.

गणेशपेठ परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका कुख्यात गुंडाने कारागृहातून सुटल्यावर खंडणी वसुलीसाठी आणि स्वतःच्या नावाची दहशत पसरवण्यासाठी डझनभर वाहनांची तोडफोड केली. सोबतच अनेक दुकानांमध्ये जाऊन सुद्धा तोडफोड केली. त्याच्यासोबत असणाऱया गुंडानीही रस्त्यावर तोडफोड करत त्यावेळी तिथे विरोध करणाऱ्या काही लोकांना मारहाण केली. दरम्यान हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तोडफोड करणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत.

Intro:नागपूरात गुंडांच्या एका टोळीनं सोमवारी मध्यरात्रीपासून ते मंगळवारी पहाटेपर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात हैदोस घातला होता... हा सगळा प्रकार cctv मध्ये कैद झालाय....कुख्यात फैजल खान या गुंडाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने वाहनांची नासधूस केली असल्याच बोललं जातंय....Body:कुख्यात फैजल खान या गुंडाने कारागृहातून सुटल्यावर खंडणी वसुलीसाठी आणि स्वतःच्या नावाची दहशत पसरवण्यासाठीच मंगळवारी पहाटे डझन भर वाहनांची तोडफोड केली हाती एवढंच नाही तर अनेक दुकानांमध्ये जाऊन सुद्धा तोडफोड केली होती...गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे,मात्र अद्याप कुणालाही अटक केलेली नाही....गुंडांनी रस्त्यावर असलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि विरोध करणाऱ्यांना मारहाणही केली,दरम्यान हा सगळा प्रकार cctv मध्ये कैद झालाय.पोलीस सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा शोध घेत Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.