ETV Bharat / state

Gold Seized At Nagpur Airport : नागपूर विमानतळावर 1 कोटी 65 लाख किमतीची सोन्याची पेस्ट जप्त

केंद्रीय सीमा शुल्क विभागाने नागपूर विमानतळावर एका प्रवाशाकडून 3 किलो सोन्याची पेस्ट जप्त केली आहे. या सोन्याची किंमत तब्बल 1 कोटी 65 लाख रुपये एवढी आहे.

Gold Seized At Nagpur Airport
नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी
author img

By

Published : May 10, 2023, 4:08 PM IST

Updated : May 10, 2023, 4:13 PM IST

नागपूर : 1 कोटी 65 लाख किमतीची 3 किलो सोन्याची पेस्ट लपवून आणणाऱ्या एका प्रवाशाला केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून अटक केली आहे. विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

सोन्याची पेस्ट जीन्स पॅन्टमध्ये लपवून आणली : कतार एअरवेजच्या विमानाने आलेला या प्रवाशाने 3 किलो सोन्याची पेस्ट जीन्स पॅन्टच्या आतील भागात लपवून ठेवली होती. तो दोहा येथून नागपूरला आला होता. या प्रवाशाबद्दल केंद्रीय सीमा शुल्क विभागाला आधीच माहिती मिळाली होती. संशयित प्रवाशी नागपूरच्या विमानतळावर उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने सोन्याची पेस्ट जीन्स पॅन्टमध्ये लपवून आणल्याची कबुली दिली. आरोपीची झडती घेतल्यावर त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये 3 किलो वजनाची सोन्याची पेस्ट आढळून आली आहे. त्या आधारे केंद्रीय सीमा शुल्क विभागाने त्याला अटक केली आहे. गेल्या काही वर्षांत अश्याप्रकारे सोन्याची पेस्ट तयार करून सोन्याची तस्करी करण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. अश्याप्रकारे सोन्याची पेस्ट कुठे तयार केली जाते आणि आरोपीने ती कशी आणली याबाबत केंद्रीय सीमा शुल्क विभाग चौकशी करत आहे.

मुंबई विमानतळावरही सोन्याची पेस्ट जप्त : दोन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरही काही प्रवाश्यांकडून तब्बल 2.1 कोटी रुपयांचे 3.3 किलो सोने जप्त करण्यात आले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. दुबई येथून सोन्याची तस्करी करण्याच्या धंद्यात अनेक गोल्ड स्मगलर टोळ्या सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षात स्मगलिंगच्या धंद्यात मोठी वाढ झाली आहे. भारतामध्येही मोठ्या प्रमाणावर सोन्याची अनाधिकृतरित्या तस्करी केली जाते. ही तस्करी विमानमार्गाने सर्वाधिक होत असल्याचे बोलले जाते.

भारतात सोन्याची तस्करी वाढली : भारतात सोनं खरेदी करणे हे इतर देशांच्या तुलनेत महाग आहे. याचं कारण म्हणजे सोन्यावर लावण्यात आलेली इम्पोर्ट ड्युटी आणि जीएसटी कर. 12 टक्के इम्पोर्ट ड्युटी आणि 3 टक्के आयात असा एकूण 15 टक्के कर आकारला जातो. ज्यामुळे भारतात सोन्याच्या दरात मोठी तफावत आढळून येते. त्यामुळे भारतात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते.

हे ही वाचा :

  1. Mumbai Airport Gold Smuggling: मुंबईतील विमानतळावर सोने तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस: साडेतीन किलो सोने जप्त, 11 जणांना अटक
  2. Cattle Smuggling : गोवंश तस्करीचा डाव वर्धा पोलिसांनी उधळला, 25 लाखाच्यावर मुद्देमाल जप्त
  3. Gold Smuggling News: डीआरआयची मोठी कारवाई: मुंबई विमानतळावर 10 कोटी रुपयांचे सोने केले जप्त; 18 सुदानी महिलेसह भारतीय महिलेला अटक

Last Updated : May 10, 2023, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.