ETV Bharat / state

Asian Games २०२३ : आशियाई गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक, उपमुख्यमंत्र्यांनी साधला 'चँपियन'च्या आई-वडिलांशी संवाद - Fadnavis interacted with parents of Ojas Devtale

Asian Game 2023 : इतिहासात प्रथमच नागपूरच्या खेळाडूनं आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजस देवतळेच्या आई-वडिलांशी संवाद साधून आनंद व्यक्त केला.

Asian Game 2023
Asian Game 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 9:38 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधताना

नागपूर Asian Game 2023 : आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे यानं बुधवारी आर्चरी मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. तसंच गुरूवारी आर्चरी मेन्स कंपाऊंड टीम इव्हेंटमध्येसुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. त्याच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं कौतुक केलं आहे. ओजसचे वडील प्रवीण देवतळे आणि आई अर्चना देवतळे यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण साधत फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्याच्या आगामी तिसर्‍या इव्हेंटमध्येसुद्धा तो सुवर्णपदक मिळवून देईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

गोल्डन बॉय ओजस : जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस प्रवीण देवतळेनं आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन गोल्ड मेडलची कमाई केली आहे. शनिवारी ओजस पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात अंतिम सामना खेळणार आहे. त्यात देखील तो गोल्ड मेडल जिंकेल अशी आशा सर्व नागपूरकरांना आहे.

दोन गोल्ड नंतर आता तिसऱ्याची प्रतीक्षा : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिरंदाजी मिश्र दुहेरी अर्चरी प्रकारात गोल्ड मेडल जिंकलं. ज्योती सुरेखा वेण्णम सोबत खेळताना गोल्ड मेडलची कमाई केल्यानंतर काल देखील मेन्स कंपाऊंड टीम इव्हेंटमध्येसुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. आता पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारत उद्या अंतिम सामना खेळणार आहे. त्यात देखील तो गोल्ड मेडल जिंकून नागपूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवेलचं अशी आशा आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी घेतली झेप : गेल्याचं महिन्यात बर्लिनमध्ये पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत नागपूरच्या ओजस देवतळे या प्रतिभावान खेळाडूनं सुवर्ण पदकाचा वेध घेत स्पर्धा गाजवली होती. ओजसच्या सुवर्ण कामगिरीमुळं जागतिक तिरंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतल्यानं नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक कामगिरी करणारा ओजस पहिला भारतीय तिरंदाज ठरला होता.

नागपुरात नाहीत आवश्यक सोयीसुविधा : तिरंदाजी खेळासाठी नागपुरात बेसिक सोयीसुविधाच उपलब्ध नाहीत. त्यामुळं पाहिजे तसा सराव करता येत नसल्यानं, ओजसनं सातारा येथील प्रशिक्षण संस्थेत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय आज सार्थकी लागला आहे. सातारा इथं ओजसच्या खेळात मोठा सुधार झाला आहे. परिस्थिती कशीही असो, अचूक नेम साधण्याची किमया त्यानं अवगत केली आहे.

निवड चाचणीत नवा विक्रम : भारतीय धनुर्विद्या संघटनेतर्फे हरियाणाच्या सोनिपत येथील साई स्टेडियममध्ये निवड चाचणीसाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात ओजसनं १४५० पैकी १४२३ गुणांची नोंद करून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. महत्वाचं म्हणजे या अगोदर हा रेकॉर्ड १४१९ गुणांचा होता.

हेही वाचा -

  1. Asian Game 2023 : उपांत्य सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचं विजयी 'तिलक', अंतिम फेरीत प्रवेश करत केलं पदक निश्चित
  2. ICC Cricket World Cup 2023 PAK vs NED : दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान करणार प्रथम फलंदाजी; जाणून घ्या प्रमुख खेळाडू कोण
  3. Rachin Ravindra : विश्वविजेत्या संघाला आपल्या अष्टपैलू कामगिरीनं नाचवणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण, घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.