नागपूर - संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती नागपूरमध्ये साजरी झाली. यानिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमी येथे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी विशेष बुद्धवंदना घेतली व धम्मप्रवचन केले.
या वेळी, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून वंदन केले. इतिहासात प्रथमच बुद्ध पौर्णिमेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पवित्र दीक्षाभूमीचे द्वार बंद ठेवण्यात आले. बुद्ध पौर्णिमा आपण आपल्या घरीच राहून तथागत बुद्धाला पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलित करून वंदन करून साजरी करण्याच आवाहन केलं आहे.