ETV Bharat / state

Ganesh Chaturthi २०२३ : भक्तांच्या श्रद्धेचा सुगंध दरवळणार तुमच्याचं देव्हाऱ्यात, कसा ते बघाच - Ganesh Festival 2023

Ganesh Chaturthi २०२३ : गणपतीला वाहिलेली फुलं, रोजचा हार अशा रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून टेकडी गणपती मंदिरात (Tekdi Ganesh Mandir) धुपकांडी तयार केली जात आहे. या उपक्रमामुळे रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न मार्गी लागला असून भक्तांच्या श्रद्धेचा देखील मान राखला जात आहे.

Tekdi Ganesh Mandir Nagpur
टेकडी गणेश मंदिर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 2:10 PM IST

Updated : Sep 18, 2023, 2:36 PM IST

भक्तांच्या श्रद्धेचा सुगंध दरवळणार तुमच्याचं देव्हाऱ्यात

नागपूर : Ganesh Chaturthi २०२३ : मंदिरात भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेनं अर्पण केलेल्या हार आणि फुलांचे नेमकं काय होतं असेल, ते निर्माल्य कचऱ्यात फेकली तर जात नसेल ना हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात घर करून असतो. नागपूर येथील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात (Tekdi Ganesh Mandir) येणाऱ्या काही भक्तांनीसुद्धा हा प्रश्न मंदिराच्या विश्वस्तांना विचारला. यावर मंदिर विश्वस्तांनी एक उपाय शोधला. तो म्हणजे मंदिरात भक्तांनी गणपतीला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून धूपकांडी (Dhoop Candy) तयार करण्याचा उपक्रम (Fragrant Incense of Nirmalya) हाती घेतलाय.

निर्माल्यापासून धूप कांडी तयार : रोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून सुमारे २५ किलो धुपकांडी रोज तयार (Manufacturer of Dhoop Candy In Nagpur) केल्या जातात. महत्वाचे म्हणजे आपणचं देवाला वाहिलेल्या फुलांचा सुगंध, धूप स्वरूपात आपल्या घरातील देव्हाऱ्यात दरवळणार आहे, हे समजल्यानंतर भक्त देखील मोठ्या प्रमाणात या धूपकांड्या विकत घेत आहेत. या उपक्रमामुळे ५ महिलांना तर रोजगार मिळाला. शिवाय रोज गोळा होणाऱ्या हजारो किलो हार, फुलांचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.

अशी आहे टेकडी गणेशाची ओळख : भारतातील गणपती भक्तांच्या आस्थेचं व श्रद्धेचं केंद्र म्हणून नागपूर येथील टेकडी गणेश मंदिर (Tekdi Ganesh) ओळखले जाते. टेकडीचा गणपती म्हणजे भक्तांच्या हाकेला 'ओ' देणारा विघ्नहर्ता. अशी मंदिराची महिमा पंचक्रोशीतील आहे. टेकडी गणपती मंदिरात रोज हजारोच्या संख्येत भाविक येतात. चतुर्थी किंवा इतर सण उत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येने असते. अश्या परिस्थितीत मंदिरात येणारे भक्त श्रद्धेपोटी हार, फुलं बाप्पाला अर्पण करतात. भक्ताने वाहिलेले फुल निर्माल्याचे नंतर काय होते हा प्रश्न प्रत्येक भक्तांच्या मनात घोळत असतो. अनेकदा तर भक्तांनी वाहिलेली फुल, हार कचऱ्यात फेकल्याचे दिसते. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जातात. काही वेळा तर भक्तांचे हार आणि फुल परत बाजारात विकले जातात असे देखील आरोप होत असतात. त्यामुळे भक्तांच्या मनात मंदीराचे पावित्र्य कमी होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय नागपूरच्या टेकडी मंदिर विश्वस्तमंडळाने शोधला आहे.

अशा तयार केल्या जातात धूपकांडी : सर्वात आधी मंदिरात गोळा झालेले निर्माल्य हे काही दिवस वाळवले जाते. त्यानंतर निर्माल्य क्रशर माशीनमध्ये टाकून त्याची पावडर तयार केली जाते. त्यात प्रीमिक्स (गाईचं शेण, सुगंधी साहित्य) टाकून ते परत मशीनमध्ये मिक्स केलं जातं. त्यानंतर मशीनच्या मदतीने धूप- कांडी तयार केल्या जातात. निर्माल्यापासून धूप तयार करण्याचा प्रयोग वर्धा जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या आजनसराच्या 'भोजाजी महाराज' मंदिरात (Bhojaji Maharaj Temple) काही वर्षांपासून सुरू आहे. त्याचीचं माहिती घेऊन टेकडी गणेश मंदिरात हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

अवघ्या दहा रुपयांमध्ये दरवळणार सुगंध : टेकडी गणपती मंदिरात एका दिवसात सुमारे २० ते २५ किलो धूप तयार केले जातात. हे धूप केवळ दहा रुपयांमध्ये मंदिरात येणाऱ्या भक्तांना उपलब्ध करून दिले जाते आहे. तर धूप कांडी तयार करण्याच्या कामात सध्या पाच महिलांना नियुक्त करण्यात आले आहे. त्या हार आणि फुलं वाळवतात आणि त्यापासून धूप तयार करण्याचं काम करतात. या उपक्रमामुळे पाच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा -

  1. Ganeshotsav 2023 : ताशा तर्रारररला ढोलही वाजला! गणरायाच्या आगमनाचा जल्लोष; पुण्यातील ढोल-ताशा पथकं सज्ज
  2. Konkani Jakhadi Dance : गणेशोत्सव काळातील कोकणातील प्रसिद्ध 'जाखडी लोककला'; जाणून घ्या इतिहास
  3. Ganeshotsav २०२३ : गणपतीनं स्वप्नात येऊन दिला दृष्टांत, काय आहे पाच गावांच्या सीमेवर वसलेल्या मयुरेश्वर मंदिराची आख्यायिका

Last Updated : Sep 18, 2023, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.