ETV Bharat / state

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात अवनी वाघिणीच्या बछड्याचा मुक्तसंचार - free movement of avni tiger calf at pench tiger project

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार अवनी वाघिणीच्या बछड्याला प्रशिक्षण देण्यात येत होते. या समितीच्या शिफारशीनंतर या वाघिणीला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतर तिला रेडिओ कॉलर करण्यात आले होते.

free movement of avni tiger calf at pench tiger project
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात अवनी वाघिणीच्या बछड्याचा मुक्त संचार
author img

By

Published : Mar 6, 2021, 10:10 AM IST

नागपूर - वन्यजीव प्रेमींसाठी आजचा दिवस आनंद देणारा आहे. अवनी वाघिणीच्या बछड्याला पेंच व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्यात आले आहे. आईपासून वेगळे झालेल्या या बछड्याला मागील दोन वर्षांपासून प्रशिक्षण देण्यात येत होते. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर या शावकाला २२ डिसेंबर २०१८ रोजी पेंचमधील तितरालमांगी येथील सुमारे पाच हेक्टर बंदिस्त क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी आणले गेले.

रिपोर्ट

पीटीआरएप-८४ या नावाने ओळखली जाणार वाघिण -

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार तिला प्रशिक्षण देण्यात येत होते. या समितीच्या शिफारशीनंतर या वाघिणीला निसर्गमुक्त करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतर तिला रेडिओ कॉलर करण्यात आले होते. राज्याच्या वन्यजीव विभागाच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे तिच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. शुक्रवारी या वाघिणीच्या अधिवासाचा दरवाजा उघडण्यात आला आणि तिला पेंचच्या जंगलात मुक्त करण्यात आले. तीन वर्षे आणि दोन महिने वय असलेली ही वाघिण पीटीआरएप-८४ या नावाने ओळखली जाणार आहे.

अवनीच्या मृत्यूनंतर बछड्याला केले होते जेरबंद -

वनविभागाच्या आदेशानुसार अवनी टी-१ या वाघिणीला शिकाऱ्याकडून ठार मारण्यात आले होते. अवनीने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि राळेगाव तालुक्यातील १३ व्यक्तींवर हल्ला करून ठार मारल्यामुळे हा निर्णय वन विभागाने घेतला होता. अवनीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्यांचा प्रश्न पुढे आला होता. त्यानंतर अवनीचा बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने अनेक प्रयत्न केले. दरम्यान एक बछड्याला पकडण्यात यश आले होते.

हेही वाचा - दोन कुटुंबासाठी सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नका; शशिकांत शिंदेंचा कृषी कायद्याला विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.