नागपूर - गेल्या २ दिवसांच्या गदारोळानंतर बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. त्यांनी बेरोजगारी, नोटबंदी, काळा पैसा आदी मुद्द्यांवरून भाजपला सळो की पळो करून सोडले. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर भाजप सदस्यांनी सभात्याग केला.
LIVE UPDATES :
- ५.०० - जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणे - आदिती तटकरे
- ४. ५८ - अनुसूचित जमातीची संख्या मोठी आहे, त्या समाजातील महिलांच्या विकासासाठी तरतूद करावी- आदिती तटकरे
- ४.५६ - रस्त्यांची कामांची कामे लवकरात लवकर सुरू करावी - वैभव नाईक
- ४.५५ - मत्स्य दुष्काळ पडला आहे, त्यांना मदत करावी - वैभव नाईक
- ४.५० - नुकसानग्रस्त शेकऱ्यांच्या मुलांची फी माफ करावी - अभिमान्यू पवार
- ४.५० - जिल्हा परिषद शाळांची अवस्था वाईट आहे, त्याकडे सरकारने लक्ष घालावे - अभिमन्यू पवार
- ४.४५ - अमरावती जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या इमारती चांगल्या कराव्या, बसण्यासाठी चांगली व्यवस्था करावी - सुलभाताई खोडके
- ४.४० - मोकळ्या जागेत मैदान तयार करावेत - सुलभाताई खोडके
- ४. ३० - महसूल खात्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा, त्याची भरती लवकर करावी - रवीशेठ पाटील
- ४.२० - रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, खड्डेमुक्त रस्ते करावे - अतुल भातखळकर
- ४.१५ - मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या धोपणांची अमंलबजावणी लवकर व्हावी, पालिकेने लक्ष घालावे - अतुल भातखळकर
- ४.०१ - माळशिरस मतदारसंघात दवाखाने आहेत, मात्र डॉक्टर नाहीत, डॉक्टरची भरती लवकर करावी - राम सातपुते
- ४.०१ - अवकाळी पावसामुळे पिकांबरोबर जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे, ज्याची जमीन वाहून गेली आहे, त्यांनाही मदत करावी - राम सातपुते
- ४.०० - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मदत करावी - श्यामसुंदर शिंदे
- ३.५५ - विमा कंपन्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत - सुरेश वरपूरकर
- ३.५० - अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा - सुरेश वरपूरकर
- दु. २.५६ - मुंबईमध्ये राहण्याचा खर्च, बांधकाम कर वाढले आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे - मंगलप्रभात लोढा
- दु. १.३० - विधानसभेचे कामकाज सुरू
- स. ११.५४ - भाजप सद्स्यांचा सभात्याग
- स. ११.५१ - शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार देण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक
- स. ११.५५ - भाजपला मेहबुबा मुफ्ती पटते. मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू पटत होते? रामविलास पासवान तुम्हाला चालतात. त्यामुळे तुम्ही सावरकरांबद्दल आम्हाला शिकवू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
- स. ११.५० - लालू आणि नितीश कुमारची युती भाजपने तोडली. यांना चाललेले संसार मोडून त्यात पाय घालायची सवय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
- स. ११.४४ - गोवंश हत्याबंदीचा कायदा का सर्वत्र लागू झाला नाही. माझ्या महाराष्ट्रात ती माता आणि बाजूला जाऊन खाता, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
- स. ११.३९ - बेळगाव युक्त महाराष्ट्राला आता कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र म्हणणार - मुख्यमंत्री
- स. ११.३८ - नोटबंदी, बेरोजगारी, काळा पैसा या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
- स. ११.२३ - काँग्रेसच्या जीवावर सरकार बनवण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला नव्हता. मात्र, त्या शब्दांचा पुळका फडणवीसांना कधीपासून येत आहे.
- स. ११.२२ - सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या ग. दि. माळगुळकरांच्या ओळींवरून केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
- स. ११.१६ - राज्यपालांनी मराठीतून अभिभाषण केल्याने मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
- स. ११.१५ - राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री बोलण्यास सुरुवात
- स. ११.०८ - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून सारथी संस्था दुर्लक्ष आणि इतर स्थगन प्रस्तावावर शासन निवेदन देणार.
- स. 11.06 - नागपूर महापौर संदीप जोशी गोळीबार प्रकणावरील गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन विधानसभा पटलावर ठेवले.
- स. ११ वा. - विधानसभेचे कामकाज सुरू, कागदपत्रे पटलावर ठेवली
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. कधी सावकर, तर कधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. विधानभवनाबरोबरच बाहेर देखील मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.