ETV Bharat / state

नागपूर पोलिसांकडून चार आरोपींना अटक 35 ग्रॅम एमडी ड्रग्ससह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - नागपूर गुन्हे बातमी

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका ड्रग्स पेडलर्ससह चौघांना अटक केली आहे. त्यांच्या कडून 35 ग्रॅम एमडी नावाच्या ड्रग्ससह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस पथक
पोलीस पथक
author img

By

Published : Nov 17, 2020, 7:59 PM IST

नागपूर - गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका ड्रग्स पेडलर्ससह चौघांना अटक केली आहे. मोहम्मद इश्तियाक वल्द मोहम्मद इशपाक अन्सारी (वय 27 वर्षे) या मुख्य आरोपीसह सोहेल पटेल वल्द मजहर पटेल (वय 22 वर्षे), मोहम्मद कफिक वल्द मोहम्मद अयुब (वय 24 वर्षे) आणि मोहम्मद दानिश वल्द खालीद अन्सारी (वय 26 वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून 35 ग्रॅम एमडी ड्रग्ससह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन व्यक्ती ड्रग्स विकण्यासाठी नागपूर शहरात येणार आहेत, अशी गुप्त माहिती नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने पाचपावली परिसरात सापळा रचला रचला होता. पोलिसांना ज्या व्यक्तीची माहिती मिळाली होती, ती व्यक्ती त्या ठिकाणी येताच आधीच तयार असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने आपली ओळख मोहम्मद इश्तीयाक वल्द मोहम्मद इशपाक अन्सारी आणि सोहेल पटेल वल्द मजहर पटेल. अशी दिली. त्यांची चौकशी केली असता त्याने भिवंडी येथील दानिश अन्सारी आणि मोहमद कफिक मोहमद आयुब यांची नाव सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाहीा अटक केली. यातील दानिश हा भिवंडी येथील ड्रग पेडलर्स असून तो इतरांना ड्रग पुरवत असल्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून 35 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे. या सह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ड्रग्स माफियांची नागपूरवर वाईट नजर

गेल्या काही वर्षात उपराजधानी नागपुरात ड्रग्स विक्रीचा अवैध धंदा वाढताना दिसत आहे. तरुणांना ड्रग्सची सवय लावून त्याचे आयुष्य खराब करण्याऱ्या आरोपींसाठी नागपूर हे मध्य केंद्र असल्याचे देखील पुढे आले आहे. मात्र, अमली पदार्थ विरोधी पथकाने अशा आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची गती वाढवली आहे. त्यामुळे अशा आरोपींचे नेटवर्क अजूनही स्थापित होऊ शकलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.