ETV Bharat / state

Ashish Deshmukh: भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा करणार भाजपमध्ये प्रवेश - आशिष देशमुख

आशिष देशमुख यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याविषयी भाजपतर्फे अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आशिष देशमुख यांचा फोन बंद असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र, आशिष देशमुख यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील दिल्याची माहिती पुढे येत आहे.

Ashish Deshmukh will rejoin BJP
आशिष देशमुख यांचा पुन्हा भाजप प्रवेश
author img

By

Published : Jun 15, 2023, 12:43 PM IST

नागपूर : आशिष देशमुख यांचा 18 जून रोजी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. 2014 मध्ये काटोल मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर देशमुख विजयी झाले होते. मात्र त्यानंतर चार वर्षांनी ते भाजपमधून बाहेर पडले होते. त्यानंतर वर्धा येथे जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

निलंबन व पक्षातून बरखास्त : 2019 मध्ये आशिष देशमुख यांनी काँग्रेसतर्फे नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, अलीकडच्या काळात आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांवरच टीका केली होती. त्यानंतर त्यांचे काँग्रेसमधून सुरुवातीला निलंबन व नंतर पक्षातून त्यांना बरखास्त करण्यात आले. दरम्यानच्या काळात भाजप नेत्यांशी त्यांची जवळीक वाढली होती, गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या घरी देखील गेले होते. त्यानंतर आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. सावनेर विधानसभा मतदार संघातून आशिष देशमुख भाजपकडून निवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निष्कासन : काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीच्या आदेशानुसार आशिष देशमुख यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ०५ मार्च राजी आशिष देशमुख यांना कारणे दाखवा, नोटीस बजावली होती.

काँग्रेसमधून मार्गदर्शक तत्वानुसार निष्कासन : आशिष देशमुख यांच्यावर पक्षविरोधी वर्तन तसेच पक्ष नेतृत्वाबद्दल जाहीर वक्तव्य केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. त्याला ९ एप्रिल रोजी आशिष देशमुख यांनी उत्तर दिले होते. परंतु त्यांनी दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचे निष्कासन केले होते.

हेही वाचा :

  1. Deshmukh Met Bawankule : काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुखांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट
  2. Ashish Deshmukh On Nana Patole : बाळासाहेब थोरातांनंतर आशिष देशमुखांची नाना पटोलेंवर आगपाखड; राजीनाम्याची केली मागणी
  3. Aashish Deshmukh On Imran Pratapgadhi : चिंतन शिबिरात आता शायरी, कव्वाली शिकवा; काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.