नागपूर: ध्वजारोहणानंतर महानगर संघचालक राजेश लोहिया म्हणाले की आपण स्वीकारलेल्या गणतंत्रा अनुसार आतापर्यंत आपण चाललो की नाही, पुढे किती चालायला हवे,याचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतीवीर जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते त्यांची देखील आठवण आजच्या दिवशी करावी असं ते म्हणाले. देशाला प्रगतीच्या वाटेवर सर्व घेऊन जाण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
कडक सुरक्षा
दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने आरएसएस मुख्यालयाची रेकी केल्याची माहिती सुरक्षा एजन्सीज कडून नागपूर पोलिसांना देण्यात आली होती. तेव्हा पासून नागपूर पोलिसांनी संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढली आहे. परिसरात देखील अनोळखी व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. संघ मुख्यालय परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.