नागपूर : उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याने ५ वर्षीय मूक चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली नागपूरात घडली आहे. ज्योती राजू साहू असे मृत मुलीचे नाव आहे. ती काल पासून बेपत्ता होती. घटना नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. काल दुपारी ती खेळायला गेली होती. खेळखेळता ती टाकीत पडली असावी परंतु ज्योतीला बोलता येत नसल्याने ज्योती ओरडू शकली नाही. त्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.
ज्योती बेपत्ता झाली होती : ज्योती ही कालपासून बेपत्ता होती. तिचा शोध घेत शेजारच्या लोकांनी संपूर्ण कळमना परिसर पिंजून काढला. मात्र,कुठेही तिचा पत्ता लागला नाही. आज सकाळपासून ज्योतीचे वडील राजू शोध घेत असताना घराच्या काही अंतरावर असलेल्या एका बांधकामातील सेप्टिक टॅंकच्या पाण्यात ज्योतीचा मृतदेह आढळून आला. ज्योती परिसरातील लहान मुलांसोबत खेळत होती. दरम्यान ती सेफ्टीक टॅंक मध्ये पडली असावी. मात्र तिचा आवाज कुणाला ही आला नाही, त्यामुळे ती बाहेर न आल्याने ज्योतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बेलतरोडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह उत्तरीय तपासणी करता पाठवून चौकशीला सुरुवात केली आहे.
ज्योतीला शोधण्यात पोलिसांनी जागवली रात्र : बेलतरोडी ठाण्याच्या हद्दीतील बेसा परिसरात पाच वर्षीय चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी रात्रभर ज्योतीचा शोध घेतला. मात्र, तिचा थांगपत्ता लागला नाही. आज सकाळी तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.
पोलिसांचा तपास सुरू : ज्योती साहू काल बेपत्ता झाल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी संपूर्ण बेसा-बेलतरोडी हा भाग पिंजून काढला. त्याचवेळी अनेकांनी सेफ्टीक टॅंकमध्ये शुद्ध डोकावून बघितले. तेव्हा त्यांना पाण्यात काहीही आढळून आले नाही. आज सकाळी ज्योतीच्या वडिलांना टॅंकच्या पाण्यात ज्योतीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या घटनेमागे आणखी काही कारण आहे का याचा शोध बेलतरोडी पोलिसांनी सुरू केला असून क्षवविच्छेदनाच्या अहवालानंतर तपासाची दिशा स्पष्ट होईल.
ज्योती मूळची छत्तीसगडची : ज्योतीचे आई वडील मूळचे छत्तीसगढ येथील राहणारे आहेत. कामाच्या शोधात ते नागपूरला आले होते. त्यांना 4 मुली असून ज्योती सर्वात लहान होती. ज्योती जन्मापासूनच बोलू शकत नव्हती.
हेही वाचा : Thane Crime: देवीची क्षमा मागून चोरट्याने लंपास केले मंदिरातील साहित्य; चोरीचा प्रकार सीसीटिव्ही कैद