नागपूर: नागपूर जिल्हाच्या कन्हान कांन्द्री भागातील डब्ल्यूसीएलमध्ये (WCL Firing) (कोल माईन) महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानावर गोळीबार (Firing on security forces) झाल्याची घटना घडली आहे. टेकडी परिसरात मिलिंद खोब्रागडे हे परिसरात कर्तव्यावर होते. यावेळी तिथे आलेल्या दोघांचा काही कारणावरून वाद झाला. वादावादीतून एकाने देशी कट्ट्याने डोक्यावर गोळी (Firing from the native katta) मारली. (Latest news from Nagpur) जखमी अवस्थेत सध्या मिलिंद खोब्रागडे या जवानांवर आशा हॉस्पिटल कन्हानमध्ये उपचार सुरू (Nagpur Crime) आहे.
नेमका वाद कशासाठी?
घटनेची माहिती समजताच कन्हान पोलिसांनी जखमी मिलिंद खोब्रागडेला रुग्णालयात दाखल केले. त्यांची तब्येत अत्यंत नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. कन्हान पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून दुसऱ्या सहकाऱ्याचा शोध सुरू आहे. नेमका वाद कशासाठी झाला याचा देखील तपास पोलीस करत आहे.
चर्चांना फुटला पेव: मिलिंद खोब्रागडेवर दोन आरोपींनी गोळीबार केल्यानंतर परिसरात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आरोपी आणि मिलिंदचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच वादाचे रूपांतर गोळीबाराच्या घटनेत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे; मात्र याबाबत नागपूर ग्रामीण पोलिसांनी कोणताही खुलासा केलेला नाही.