ETV Bharat / state

नाना पटोलेवर गुन्हा दाखल करा - गडकरी - नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता देशभरात वाद पेटला आहे. भाजपकडून (File a case against Nana Patole) या वक्तव्याचा निषेध होत असताना आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही ट्विटद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Union Minister Nitin Gadkari) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ( Nana Patole statement about PM Modi ) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
author img

By

Published : Jan 18, 2022, 8:59 AM IST

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता देशभरात वाद पेटला आहे. भाजपकडून या वक्तव्याचा निषेध होत असताना आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari react on nana patole statement ) यांनीही ट्विटद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र (Union Minister Nitin Gadkari) मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. त्यांनी वापरलेली भाषा निंदनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नितिन गडकरी यांचे ट्विट
नितिन गडकरी यांचे ट्विट

मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो

पाकिस्तानच्या सीमेनजिक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो. तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. (Devendra Fadnavis react on nana patole statement) आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही. वैचारिक - बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असे ट्वीट करत फडणवीस यांनी पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की, आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा

या बाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘नेता तैसा कार्यकर्ता, त्यांचे राष्ट्रीय नेते मध्येच गायब होतात, काहीही बोलतात, परिणाम काय होईल, परंपरा काय त्या मोडल्या जातील याची काळजी करत नाहीत. त्यात त्यांचे अध्यक्ष नाना पटोले वेगळे काय करणार? मी त्यांना भ्रमिष्ट म्हणत नाही, पण भ्रमिष्टासारखे त्यांचे वर्तन सुरू आहे. पंजाबमधील घटनेला ते नौटंकी काय म्हणाले, अमित शहांवर त्यांनी आरोप केला की त्यांचाच हा कट आहे. काय बोलतो, काय अर्थ होतो, याचा काही त्यांना पत्ता नाही. भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही. आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की, आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा’, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

काँग्रेस पक्ष हा एक वैभवशाली परंपरा असलेला पक्ष आहे

नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान हे कुठल्या पक्षाचे नसतात तर, ते देशाचे असतात, त्याचा विसर नाना पटोले यांना पडलेला आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसची रया घालवली असून त्यांना निवडणुकीत यश भेटत नाही म्हणून हे सर्व सुरू आहे. काँग्रेस पक्ष हा एक वैभवशाली परंपरा असलेला पक्ष आहे. असे असताना जर नाना पटोले असे वक्तव्य करत असतील तर, ते फार दुर्दैवी आहे. याने सातत्याने त्यांचा बालिशपणा उघड होत आहे. याची किंमत नाना पटोले यांना चुकवावी लागेल, असेही दरेकर ( Praveen Darekar react on nana patole statement ) यांनी सांगितले.

निवडणुकी प्रचारादरम्यान असे मी वक्तव्य केलेल आहे

जे काही वक्तव्य मी मोदी यांच्याविषयी बोललो तो मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी नाही, तर तो एक गाव गुंड आहे. मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल मी असे सांगितले. निवडणुकी प्रचारादरम्यान असे मी वक्तव्य केलेल आहे. पंतप्रधान मोदींविषयी असे वक्तव्य केलेले नाही, अशी सारवासारव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

माझ्या मतदार संघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत मी बोलत होतो

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांद्याबद्दल मी अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओतील मोदी नावाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध नसून माझ्या मतदार संघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत मी बोलत होतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

व्हिडिओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील स्थानिक गुंड मोदीबद्दल नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा तो व्हिडिओ असून खोडसाळपणे सोशल मीडियावर तो व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो की, मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर, मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो. पण भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर काही उतावीळ भाजप नेते त्या वक्तव्याचा संबंध खोडसाळपणे व जाणीवपूर्वक पंतप्रधान मोदी यांच्याशी जोडून पंतप्रधान मोदी यांचा तेच अवमान करत आहेत हे दुर्दैवी आहे.

हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : उत्पल पर्रिकरांविरोधात एकही उमेदवार उभा करू नका - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.