मुंबई - आज विधिमंडाळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आज १०.४५ वाजण्याच्या सुमारास विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विरोधकांनी सुरुवातीला २ दिवस विधानसभेत चांगलाच गदारोळ केला. मात्र, तिसऱ्या दिवसापासून कामकाज सुरळीत सुरू झाले. गुरुवारी मात्र मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तर आणि पहिल्या दिवसाच्या पुरवणी मागण्यांच्या उत्तरावर भाजपने सभात्याग केला. मात्र, काही वेळानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले.
LIVE UPDATES :
- 6.15 - उत्तरापासून दूर जाऊ नका, वचनमामा आणि शपथनाम्यामध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करा
- 6.10- हे केल नाही तर जनता करेल सारा सुफडा साफ - मुनगंटीवर यांची कवितेतून सरकारवर टीका
- 6.05 - आता शिवसेनेत गेलेत, झूठ मत बोलो, अब्दूल सत्तारांना मुनगंटीवार यांचा टोला
- 6.02 - काँग्रेसला विश्वास नव्हता, शिवसेना असे वागेल -सुधीर मुनगंटीवार
- 6.00 किती दिवसात शेतकऱ्यांना मदत करणार - सुधीर मुनगंटीवार
- 5.50 - शपथनामा , वचनमामा यामध्ये दिलेले वचन केव्हा पूर्ण करणार - सुधीर मुनगंटीवार
- 5.45 - अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत केव्हा करणार - सुधीर मुनगंटीवार
- 5.40 - संकटात असणाऱ्याला शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे - सुधीर मुनगंटीवार
- 5.30 - अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु
- दु. २.३६ - तोट्यातील सरकारी कंपन्या आणि महामंडळे बंद करा किंवा त्यांचे पुनरुज्जीवन करा, महालेखापाल यांची राज्य सरकारला शिफारस
- दु. २.३५ - भारताचे नियंत्रक व महालेखा शिक्षकांचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर मांडला
- दु. १२.२० - मागच्या सरकारमध्ये पुरवणी मागण्यावरून विरोधक आक्षेप घ्यायचे. आता १६ हजार कोटींच्या मागण्या आणल्या. तातडीच्या कामासाठी पुरवण्याची तरतूद करावी लागते हे आता सरकारला कळले असेल. स्थगिती आदेशाचा सपाटा आता बंद केला पाहिजे. प्रकल्प बंद केले, तर रस्त्याची कामे खोळंबतील. पीक विम्याचा आंदोलनामुळे कृषी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विमा कंपन्यांचा प्रतिसाद मिळत नाही - चंद्रकांत पाटील
- दु. १२.०० - माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण, गृह आणि अर्थमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी देशासाठी व महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गौरव प्रस्ताव ठेवण्यात येईल - विधानसभा अध्यक्ष
- स. ११.२१ - देशात आणि राज्यात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू झालेल्या आंदोलना दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. मात्र, तो चुकीचा आणि फेक आहे. राज्यात आणि देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
- स. ११.२० - चारचाकी गाड्यांना बंधनकारक केलेला एकच फास्ट टॅग इतर गाड्यांनाही चालला पाहिजे. त्यासाठी संशोधन करण्याची मागणी आमदार चेतन तुपे यांनी केली आहे.
- स. ११.१३ - विरोधी पक्षनेते कामकाजाला उपस्थित नसल्यामुळे अशोक चव्हाण यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
- स. १०.५८ - अतिउष्णतेमुळे वरुड- मोर्शीत २० हजार हेक्टरवरील संत्रा बागा जळाल्या. त्यामुळे संत्रा नुकसानासाठी विशेष पॅकेज जाहीर करा - आमदार देवेंद्र भुयार
- स. १०.५७ - अमरावती जिल्ह्यात रामदेवबाबा यांनी सुरू केलेला प्रकल्प बारगळला आहे. इतके दिवस सरकार खोटे बोलत होते. आता रामदेवबाबा पण खोटे बोलायला लागले आहेत - आमदार देवेंद्र भुयार
- स. १०.४८ - गृहमंत्री एकनाथ शिंदेंनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
- स. १०.४७ - विधानसभा अध्यक्षांनी कारवाईचे दिले निर्देश
- स. १०.४६ - आमदार मंदा म्हात्रे यांनी पुन्हा महिला आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. आमदारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.
- स. १०.४५ - विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात, सर्व सदस्यांना दिड तास औचित्याचे मुद्दे मांडण्याची संधी
- स. १०.२० - विधिमंडळ सद्स्यांचे फोटोसेशन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सडतोड उत्तर दिले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांचा उत्साह देखील वाढला आहे. त्यामुळे सर्वजण विरोधकांना तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
विधानसभेच्या आजच्या कामकाजामध्ये पुरवणी मागण्या, सत्ताधाऱ्यांचा विदर्भावर प्रस्ताव, विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणि उर्वरित पुरवणी मागण्या, असे कार्यक्रम होणार आहेत. त्यापैकी औचित्याचे मुद्दे मांडायला सद्स्यांनी सुरुवात केली आहे. मात्र, अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईवरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. आज 16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यामध्ये दुसऱ्या दिवशीच्या मागण्या सभागृहात चर्चेला येणार आहेत.
आज १० वाजण्याच्या सुमरास प्रथेप्रमाणे सर्व विधिमंडळ सद्स्यांचे फोटोसेशन झाले. त्यानंतर १०.४५ वाजता विधानसभेचे नियमीत कामकाज सुरू झाले. सत्ताधारीही विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. उद्या अधिवेशनाचा अंतिम दिवस असून अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा आणि उत्तराने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप होणार आहे.