नागपूर - उपराजधानी नागपुरात अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. यात गुन्हा दाखल होऊन पाच दिवस तर घटनेला आठवडा पूर्ण झाला आहे. यातील पाचव्या आरोपीला अटक झाली आहे. तर तीन दिवसांपासून बर्डी पोलीस राजस्थानच्या करौलमध्ये दोघांचा विविध ठिकाणी शोध घेत आहे. तेच इतर आरोपींची चौकशी सुरू असल्याने 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
बलात्काराचा घटनाक्रम -
नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशननंतर्गत गुरुवारी 29 जुलैच्या रात्री रागाचा भरात तरुणी घराबाहेर निघाली. यात मानस चौकातून ऑटोचालक साना याने मदतीच्या बहाण्याने तिला मोमीनपुरा टिमकी परिसरात एकाचा मदतीने रूम मिळवली. याच रूममध्ये ऑटोचालक साना याने अन्य तीन मित्रांना बोलवत त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यात पाचवा आरोपीने दारूसह अन्य साहित्य आणून दिले. तिच्यावर बलात्कार करून एकाने ऑटोने मेयो परिसरात सोडले असताना या ठिकाणी पुन्हा दोघांनी एका ऑटोत तिच्यावर बलात्कार केला. रविवारी घटना उघडकीस येत बर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली.
हेही वाचा - अकरावीचे प्रवेश होणार कधी? विद्यार्थ्यांसह शिक्षकही संभ्रमात
आणखी एकाला अटक दोघांचा शोध सुरू
यात चार जणांच्या अटकेनंतर तिघांचा शोध सुरू असतांना पाचवा आरोपी ऑटोचालक सलीम सय्यद (वय ३६) हा गणेशपेठमध्ये असल्याच्या माहितीवरून त्याला पकडण्यात आले. तेच इतर दोघ हे पेशाने कुली असून ते मूळचे राजस्थानचे असल्याने पळून गेल्याचा संशय होता. या दोघाना शोधण्यासाठी एक पथक दोन ऑगस्टला रवाना झाले आहे. यामध्ये दिनेश गुजर (31), रामदयाल गुजर (32) यात दोघांच्या शोधात करौल भागात लपून असल्याचा संशयावरून छापेमारी केली. मात्र, दोघेही मिळून आले नाही. त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस अटकेतील आरोपीचे नाव -
ऑटोचालक साना ऊर्फ मोहम्मद शहनवाज मोहम्मद रशिद (वय २५), त्याचा मित्र मोहम्मद तौसिफ मोहम्मद यसूफ घोडिया (वय २६), मोहम्मद मुशिर मोहम्मद बशिर पठाण (वय २३) आणि मोहम्मद फैजान मोहम्मद बशिर पठाण (वय २३) यासह सलिम सय्यद(36) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यात आरोपींना पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायलयापुढे हजर करत 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. यामुळे या प्रकरणात आणखी माहिती पुढे येईल, याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - धक्कादायक: जालन्यात दारुसाठी मुलानेच केली आईची हत्या