नागपूर - लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये बहुतांश उमेदवार लखपती तर १५ टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचा देखील समावेश आहे
नागपूर लोकसभा मतदारसंघात सध्या स्थितीत ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी तब्बल १५ टक्के उमेदवारांची संपत्ती ही कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. या यादीत गडकरी आणि पटोले यांचा देखील समावेश आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गडकरी आणि पटोले यांचा व्यवसाय शेती आहे. तर दुसरीकडे असे देखील काही उमेदवार आहेत. ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे.