नागपूर: नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र आत्महत्येचा घटनाक्रम हा संशयास्पद वाटतं असल्यामुळे पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला असता अतिशय धक्कादायक खुलासा झाला आहे. १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली नसून तिच्या वडिलांनीचं तिची हत्या केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. Father Try to Kill Daughter एवढंचं नाही तर या संपूर्ण प्रकरणात मृतक मुलीच्या बहिणीचा देखील सहभाग आढळून आल्यामुळे आता कळमना पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्या बापाला अटक केली आहे.
विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न: गुड्डू छोटेलाला रजक नामक इसम कळमना हद्दीत राहतो. पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. त्यामुळे गुड्डू यांनी दुसरी पत्नीसोबत संसार थाटला होता. गुड्डूच्या पहिल्या पत्नीची मुलीने काही दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती थोडक्यात वाचली होती. मुलगी बरी होऊन घरी परत आल्यानंतर गुड्डू याने १६ वर्षीय मुलीला गळफास देऊन तिची हत्या केली आहे.
पत्नी आणि नातेवाईकांना फसवण्यासाठी रचला कट: गुड्डू छोटेलाला रजक यांची अल्पवयीन 16 वर्षीय मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. याकरिता ती सावत्र आई, भाऊ आणि त्यांच्या नातेवाईकांना जबाबदार धरत होती. ही बाब आरोपीला माहीत होती. 4 दिवसांपूर्वी गुड्डू याने मुलीला आत्महत्या करण्याचा बनाव कर असे सांगितले. मुलीने आत्महत्या करण्यात दोर गळ्यात टाकली. त्याने टेबल पाय मारून बाजूला पाडल्यामुळे त्या मुलीला गळफास लागला. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लहान बहिणीचा सहभाग ? 16 वर्षीय मुलीला आत्महत्या करण्यासाठी आरोपी गुड्डू छोटेलाला रजक याने सांगितले होते. त्याचबरोबर मृतक मुलीच्या लहान बहिणीला संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यास देखील सांगितले होते. मोबाईलमध्ये आढळलेल्या फोटोवरून संपूर्ण घटेनला वाचा फुटली आहे.
सुसाईड नोट लिहून घेतली: आरोपी गुड्डू छोटेलाला रजक याने दुसऱ्या पत्नीला आणि तिच्या नातेवाईकांना अडचणीत आणण्यासाठी मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्याकडून सुसाईड नोट लिहून घेतली होती. सर्व आत्महत्या करण्यासाठी सर्वस्वी सावत्र आणि आणि तिच्या नातेवाईकांना जबाबदार धरण्यात आले होते.