नागपूर : आरोपी अशोक बेले वय ४५ आणि त्याची पत्नी प्रिया यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणाने वाद सुरू असल्याने ते विभक्त राहत होते. मात्र, समझोता ठरल्यानुसार दोन्ही मुले आठवड्यातुन एकदा वडीलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात होते. काल दोन्ही मुलांच्या आजोबांनी त्यांना वडिलांकडे सोडले होते. त्यावेळी आरोपीने दोन्ही मुलांना जेवनामध्ये विष देवुन ठार मारले. एवढ्यावर न थांबता त्याने मुलांच्या गळयाभोवती गळफास देवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रिन्स वय १२ आणि तनिष्का वय ०७ असे मुलांची नावे आहेत. या घटनेत तनिष्काचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर प्रिन्सवर उपचार सुरू आहेत.
मुलीचा मृत्यू तर मुलावर उपचार सुरू : मुलांचे आजोबा त्यांना परत घेऊन जाण्यासाठी गेले असता दोन्ही मुले घरात निपचित पडलेली होती. त्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तनिष्काला मृत घोषित केले. तर मुलगा प्रिंन्स हा गंभीर जखमी असुन त्याचावर उपचार सुरू आहेत.
आरोपीने केली आत्महत्या : दोन्ही मुलांना विष दिल्यानंतर आरोपीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी फिर्यादी राजु मारोतराव तल्हार यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी मृतक आरोपींविरूध्द कलम ३०२, ३०७, भादवी अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
नागपूरात ११ दिवसांत पाच हत्या : शहरातील अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पार्वती नगर परिसरात कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने विकी चंदेल नावाच्या युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. राकेश पाली असे आरोपीचे नाव आहे. तो हत्येच्या प्रकरणात नागपूर कारागृहात कैद होता, काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपींचा राकेश पालीचा भाचा आणि मृतक विकी चंदेलचा काही वाद सुरू होता. त्याचे वादातून राकेशने विकीची निर्घृण हत्या केली आहे. १ जानेवारीला नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी पाचपावलीच्या वैशालीनगर सिमेंट रोडवर एका युवकाचा खून करण्यात आला. ३ जानेवारीला वर्चस्वाच्या लढाईतून कुख्यात गुंड आसिफ ऊर्फ घोडा याचा पुतण्या व भाच्याने शेख फिरोज शेख मोईनुद्दीन याची हत्या केली.
आरोपींचा शोध सुरू : शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्वती नगर परिसरात राहणारा विकी चंदेलचा आरोपी राकेश पाली भाच्या सोबत वाद सुरू होता. याबाबत आरोपीला माहिती समजली. काल रात्री आरोपीने विकीला गाठून त्याची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. या घटेनची माहिती समजताचं अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून विकीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा : Nagpur Crimes : खुन्नस काढली! पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने दुश्मनाला संपवले; ११ दिवसांत पाच हत्या